Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी वर्ल्डकप 2019 : स्मिथ-वॉर्नर धोकेबाज, चाहत्यांनी उडवली हुर्यो...

जेव्हा दोघेही फलंदाजीसाठी आले तेव्हा चाहत्यांनी धोकेबाज म्हणत त्यांची हेटाळणी केल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 15:05 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे आता वर्ल्डकप खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण वर्ल्डकपच्या सराव सामन्यात मात्र चाहत्यांनी त्यांचीच चांगलीच हुर्यो उडवल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये शनिवारी सराव सामना झाला. या सामन्यात जेव्हा दोघेही फलंदाजीसाठी आले तेव्हा चाहत्यांनी धोकेबाज म्हणत त्यांची हेटाळणी केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात स्मिथने शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर १२ धावांनी विजय मिळवला.

इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाची पहिली फलंदाजी होती. त्यावेळी वॉर्नर जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याची हुर्यो उडवली. वॉर्नर, धोकेबाज... चालता हो..., असे म्हणत चाहत्यांनी त्याची हुर्यो उडवली. जेव्हा स्मिथ फलंदाजीला आला तेव्हादेखील चाहत्यांनी त्याला धोकेबाज म्हटले.

डेव्हिड वॉर्नरने गमावले होते 'ओपनर'चे स्थान  चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) दमदार कामगिरी करून हे दोघेही राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशात दाखल झाले. त्यांच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला बळ मिळाले आहे आणि वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. वॉर्नर व स्मिथ यांच्या समावेशाने ऑस्ट्रेलियाचा संघ संतुलित वाटत असला तरी सलामीच्या जागेवरून संघात दोन प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे. सलामीसाठी वॉर्नरचं नाणं खणखणीत असलं तरी त्यानं हे स्थान गमावल्याचे पाहायला मिळाले.

वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाच्या संघाने सोमवारी न्यूझीलंड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यातून स्मिथ व वॉर्नरने राष्ट्रीय संघात कमबॅक केले. स्मिथने पहिल्याच सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण करत आपली छाप पाडली. त्याने न्यूझीलंडच्या टॉम लॅथमचा अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव 46.1 षटकांत 215 धावांवर गुंडाळला. पॅट कमिन्स ( 3/36), बेहरेनडोर्फ ( 3/34) आणि नॅथन कोल्टर नायल ( 3/44) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. 

प्रत्युत्तरात अ‍ॅरोन फिंच याच्यासोबत सलामीला कोण येईल याची उत्सुकता लागली होती. पण, संघाने वॉर्नरच्या जागी उस्मान ख्वाजा सलामीला आला आणि सर्वांच्या भूवया उंचावल्या. पण, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॉर्नरने 43 चेंडूंत 39 धावांची खेळी करतान सर्वांची वाहवाह मिळवली. त्याच्या या खेळीत 6 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने 1 विकेट राखून हा सामना जिंकला. फिंचने 52 धावांची खेळी केली.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथवर्ल्ड कप 2019