मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ 11 गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 268 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीनं 27व्या षटकात अप्रतिम झेल टिपला. वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेटचा तो झेल होता. जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधण्यात ब्रॅथवेट अपयशी ठरला आणि चेंडू बॅटची किनार घेत धोनीच्या दिशेनं वेगानं गेला, धोनीनं चपळाईनं उजव्या दिशेला डाईव्ह मारत चेंडू झेलला आणि ब्रॅथवेटला माघारी जावं लागलं. धोनीच्या या डाईव्हवर कर्णधार विराट कोहलीलाही अवाक् केलं.