Join us  

ICC World Cup 2019 : मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकनंतर पत्नी हसीन जहाँ म्हणाली...

ICC World Cup 2019 : मोहम्मद शमीला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे अखेर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीनं अंतिम अकरामध्ये स्थान पटकावलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:25 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : मोहम्मद शमीला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे अखेर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीनं अंतिम अकरामध्ये स्थान पटकावलं. या सामन्यात त्यानं हॅटट्रिक घेत भारताला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं 40 धावांत 4 विकेट्स घेतल्या. 224 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती, परंतु शमीनं त्या षटकात हॅटट्रिक नोंदवली आणि भारताला विजय मिळवून दिला. 1987 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चेतन शर्मा यांनी हॅटट्रिक नोंदवली होती आणि त्यानंतर शमी हा वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.

वैयक्तिक आयुष्यात संघर्षातून वाट काढत असलेल्या शमीच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक झाले. पत्नी हसीन जहाँने शमीवर शारीरिक व मानसिक छळासह, मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही केला होता. तिने पोलिस चौकित तक्रारही दाखल केली होती. त्याच हसीन जहाँने अफगाणिस्तानविरुद्ध शमीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. अमर उजाला या हिंदी भाषिक वेबसाईटशी बोलताना हसीन जहाँ म्हणाली,'' देशासाठी खेळणे ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आशा करते की भारतीय संघ विजयी चषक उंचावेल.'' 

हे मत व्यक्त करत असताना तिनं शमीचं थेट नाव घेण्याचे टाळले. ती म्हणाली,''वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणे ही प्रत्येक खेळाडूसाठी गर्वाची गोष्ट असते. भारतीय संघाने हीच लय कायम राखावी.''

मोहम्मद शमीवर पत्नीने केले बलात्कार आणि खुनाचे आरोप, एफआयआर दाखल भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ गेले दोन दिवस शमीवर गंभीर आरोप करत होती. पण शुक्रवारी मात्र हसीनने शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात लाल बाजार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. शमीचे बऱ्याच देशांमधील स्त्रीयांबरोबर अनैतिक संबंध आहेत. शमीची पाकिस्तानमध्ये अलिशाबा ही प्रेयसी आहे. दक्षिण आफ्रिकेमधून शमी तिच्याबरोबर दुबईला गेला होता. तिथे दोघांनी काही काळ एकाच रुममध्ये व्यतित केला होता. त्याचबरोबर तिच्याकडून शमीने काही पैसेही घेतले होते. शामी हा देशाची फसवणूक करत आहे, असे आरोप हसीनने केले होते. पण  पुराव्यांसह हसीनने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019मोहम्मद शामीभारतअफगाणिस्तान