Join us

न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय

एका वर्षात सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या यादीत तझमिन ब्रिट्स अव्वलस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 22:11 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025  Tazmin Brits Overtake Smriti Mandhana : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सातव्या सामन्यात सलामीची बॅटर तझमिन ब्रिट्स हिने विक्रमी शतकी खेळी साकारली. तिच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने न्यूझीलंडला ६ विकेट्स आणि ५५ चेंड़ू राखून मात दिली. एवढेच नाही तर शतकी खेळीसह ब्रिट्सनं वनडेतील क्वीन अन् भारतीय संघाची सलामीची बॅटर स्मृती मानधनाला मागे टाकण्याचाही डाव साधला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ब्रिट्सच्या शतकी खेळीनंतर सुने लूसनं लुटली मैफील; न्यूझीलंडच्या पदरी सलग दुसरा पराभव

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार सोफी डिव्हाइनच्या ९८ चेंडूतील ८५ धावा आणि ब्रुक हालीडे हिने ३७ चेंडूत केलेल्या ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर ४७.५ षटकात सर्वबाद २३१ धावा केल्या होत्या. २३२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात करणाऱ्या तझमिन ब्रिट्सनं दमदार शतक झळकावले. तिची ही खेळी अनेक विक्रम मोडणारी ठरली. महत्त्वाचं म्हणजे संघाला विजय मिळवून देण्यात तिची खेळी उपयुक्त ठरली. या सामन्यात तिने ८९ चेंड़ूत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०१ धावांची खेळी साकारली. याशिवाय सुने लूस हिने ११४ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं विजयाचं खातं उघडले. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्या संघावर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. 

 

हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)

एका वर्षात सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या यादीत तझमिन ब्रिट्स अव्वलस्थानी न्यूझीलंड विरुद्धच्या शतकी खेळीसह तझमिन ब्रिट्स हिने कॅलेंडर ईयरमध्ये (२०२५) सर्वाधिक ५ शतके झळकवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. स्मृती मानधना ४ शतकासह या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. गत वर्षीही स्मृती ही ४ शतकासह टॉपला राहिली होती. पण आता दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील सलामीवीर तझमिन ब्रिट्स आणि स्मृती मानधना यांच्यात शतक झळकवण्यात कोण भारी? अशी स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Tazmin Brits century beats New Zealand; South Africa secures first victory.

Web Summary : Tazmin Brits's record-breaking century led South Africa to victory against New Zealand in the ICC Women's World Cup. Brits surpassed Smriti Mandhana with five centuries in 2025, securing South Africa's first win after Sophie Devine's strong innings.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५द. आफ्रिकान्यूझीलंडस्मृती मानधना