ICC Womens World Cup 2025 Smriti Mandhana Record Against England : वनडेची क्विन स्मृती मानधना हिने महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या भात्यातून आलेली हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. याआधी स्मृतीनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ६६ चेंडूत ८० धावांची खेळी केली होती. इंदूरच्या मैदानात इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २८८ धावा करत टीम इंडियासमोर २८९ धावांचे टार्गेट सेट केले. या धावासंख्येचा पाठलाग करताना स्मृतीनं संयमी खेळीसह आपली खेळी करत संघाचा डाव पुढे नेला. आधी कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर तिने अर्धशतकालाही गवसणी घातली. या सामन्यात स्मृतीनं इंग्लंडविरुद्ध वनडेत १००० धावांचा डावही साधला आहे.
'सासर माझं सुरेख बाई...' ज्या शहराशी खास नातं जुळणार असल्याची चर्चा तिथं स्मृतीनं पेश केला बॅटिंगचा खास नजराणा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याआधी स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड आणि संगीतकार पलाश मुच्छल याने एक खास वक्तव्य केले होते. स्मृती मानधनासंदर्भातील प्रश्नावर तो म्हणाला होता की, ती लवकरच इंदूरची सून होईल. त्याचे हे वक्तव्य गाजत असताना स्मृतीनं सासरच्या खेळपट्टीवर खेळताना दिमाखदार खेळी करत 'सासर माझं सुरेख बाई' या तोऱ्यात इंग्लंडविरुद्ध खास नजराणा पेश केल्याचे पाहायला मिळाले.
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
स्मृतीच्या नावे झाला फिफ्टी प्लसचा हा खास रेकॉर्ड
स्मृती मानधना यंदाच्या वर्षात सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. इंग्लंड विरुद्धच्या अर्धशतकासह तिने एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा खास रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. यावर्षात आतापर्यंत तिने ९ व्या वेळी ही कामगिरी केली आहे. आता फक्त मिताली राज तिच्या पुढे आहे. भारताच्या माजी कर्णधार मितालीनं २०१७ मध्ये एका वर्षात १० वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधला होता. हा विक्रम मोडून स्मृतीला नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. या यादीत एलिसा पेरी आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्व्हार्ड यांचाही समावेश आहे. या दोघींनी अनुक्रमे २०१६ आणि २०२२ या वर्षात ९ वेळा अशी कामगिरी केली होती.