Join us

स्मृती मानधनाची कमाल! मितालीचा मोठा विक्रम मोडला; 'वनडे क्वीन'ला इथंही नंबर होण्याची संधी, पण...

महिला वनडेत घरच्या मैदानात सर्वाधिक फिफ्टी प्लस धावसंख्या करणाऱ्या बॅटर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:54 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025, Smriti Mandhana Creates History Break Mithali Raj Records : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील २० व्या सामन्यात भारताची उप कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना हिने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा ती शतकाच्या जवळ येऊन फसली. स्मृती मानधनाचे शतक अवघ्या १२ धावांनी हुकले. एवढेच नाही तर तिची विकेट पडली अन् मॅचही फिरली.  भारतीय संघाने हातात आलेला सामना गमावला. पण या सामन्यात ९४ चेंडूतील ८८ धावांची स्मृतीची खेळी एक नवा विक्रम प्रस्थापित करणारी ठरली. या खेळीसह स्मृती मानधना हिने महिला क्रिकेटमध्ये अधिराज्या गाजवणाऱ्या भारताची माजी कर्णधार मिताली राज हिला मागे टाकले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् स्मृतीनं मोडला मितालीचा विक्रम

महिला वनडे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आता स्मृतीच्या नावे झाला आहे. याआधी २२ वेळा अशी कामगिरी करून मिताली राज भारताकडून अव्वलस्थानावर होती. स्मृतीनं इंदूरच्या मैदानातील ८८ धावांच्या खेळीसह २३ व्या वेळी घरच्या मैदानात फिफ्टी प्लसचा डाव साधला.

Harmanpreet Kaur World Cup Record : मितालीनंतर असा पराक्रम करणारी दुसरी बॅटर ठरली हरमनप्रीत

इथंही नंबर वन होण्याची संधी, पण... 

महिला वनडेत घरच्या मैदानात सर्वाधिक फिफ्टी प्लस धावा करण्याचा विक्रम हा सुझी बेट्सच्या नावे आहे. तिने न्यूझीलंडच्या स्टार बॅटरनं आपल्या घरच्या मैदानात २८ वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधला आहे. त्यापाठोपाठ आता स्मृती मानधनाचा नंबर लागतो. आगामी काळात स्मृती न्यूझीलंडच्या बॅटरलाही मागे टाकू शकते. पण यासाठी तिला आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवावे लागेल. मिताली राज आणि इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स या दोघींनी घरच्या मैदानात प्रत्येकी २२-२२ वेळा अशी कामगिरी केल्याचा रेकॉर्ड आहे.    

महिला वनडेत घरच्या मैदानात सर्वाधिक फिफ्टी प्लस धावसंख्या करणाऱ्या बॅटर्स

  • २८ - सूझी बेट्स (न्यूजीलंड)
  • २३ - स्मृती मानधना (भारत)
  • २२ - चार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)
  • २२ - मिताली राज (भारत)
English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana breaks Mithali Raj's record in Women's ODI cricket.

Web Summary : Smriti Mandhana surpassed Mithali Raj's record for most 50+ scores at home in Women's ODIs during the ICC World Cup match against England. She now has 23, only behind Suzie Bates' 28. Despite Mandhana's 88, India lost the match.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५स्मृती मानधनामिताली राजभारतीय महिला क्रिकेट संघ