India Women Face Australia or South Africa In 2nd Semi Final : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ नवी मुंबईतील मैदानात रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील दिमाखदार विजयासह सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. या निकालासह यंदाच्या हंगामातील सेमीफायनलमधील चारही संघ पक्के झाले आहेत. इथं एक घेऊयात फायनलची दावेदारी पक्की करण्यासाठी कोणत्या संघासमोर कोणाचे असेल आव्हान? कधी अन् कोणत्या मैदानात रंगणार सेमीफायनलचा थरार? यासंर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
| क्रमांक | संघ | सामने (P) | विजय (W) | पराभव (L) | अनिर्णित सामने (NR) | गुण (Pts) | निव्वळ धावगती (NRR) |
|---|
| १ | ऑस्ट्रेलिया (AUSW) (Q) | ६ | ५ | ० | १ | ११ | +१.७०४ |
| २ | दक्षिण आफ्रिका (RSAW) (Q) | ६ | ५ | १ | ० | १० | +०.२७६ |
| ३ | इंग्लंड (ENGW) (Q) | ६ | ४ | १ | १ | ९ | +१.०२४ |
| ४ | भारत (INDW) (Q) | ६ | ३ | ३ | ० | ६ | +०.६२८ |
भारतीय संघासमोर कोणत्या संघाचे असेल आव्हान?
सेमी फायनलमध्ये पात्र ठरलेल्या चार संघात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. प्रत्येक संघाचा साखळी फेरीतील एक सामना बाकी असून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुणतालिकेत अव्वलस्थानासाठी लढत पाहायला मिळेल. भारतीय संघ अखेरचा सामना जिंकूनही चौथ्या क्रमांकावर राहिल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेता आणि गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचणारा संघ भारतीय संघाविरुद्ध पहिल्या सेमीफायनलमध्ये खेळताना दिसेल. याशिवाय या सामन्यातील पराभूत संघ आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या सेमीफायनलची लढत पाहायला मिळेल.
स्मृती-प्रतीका जोडीने रोहित-गिलला टाकले मागे! आता दोघींना खुणावतोय सचिन-गांगुलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
कुठं अन् कधी रंगणार सेमीचा थरार?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमधील पहिली लढत गुवाहटीच्या बारसापाराच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. बुधवारी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी खेळवण्यात येणार आहे. याशिवाय नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या स्टेडियमवर गुरुवारी ३० ऑक्टोबरला सेमी फायनलमधील दुसरी लढत नियोजित आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. या संघातील पराभूत संघ पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना दिसू शकते.