आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या काल झालेल्या चित्तथरारक सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली. आता दक्षिण आफ्रिकेसोबत फायनलमध्ये महिला संघाला दोन हात करावे लागणार आहेत. अशातच टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला आहे. ही रक्कम पाहून सातवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघावर पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
ICC Women's World Cup 2025 Final पूर्वी आयसीसीने बक्षीस रकमेचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. हा विश्वचषक महिला क्रिकेटच्या इतिहासात विक्रमी बक्षीस रक्कम देणारा ठरला आहे, अर्थात पुढील वेळी ही रक्कम वाढविली जाणार आहेच परंतू गेल्या वर्षी विजेत्याला जेवढी रक्कम मिळालेली त्याच्या जवळपास दुप्पट रक्कम यंदाच्या उपविजेत्या संघाला मिळणार आहे. मग विजेत्याच्या बक्षीसाची रक्कम किती असेल विचार करा...
२०२२ मध्ये विजेत्या ऑस्ट्रेलियाला $१.३२ मिलियन म्हणजेच १२ कोटी रुपये मिळाले होते. यंदा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला ही रक्कम $४.४८ मिलियन (सुमारे ४० कोटी रुपये) एवढी प्रचंड मिळणार आहे. ही वाढ जवळपास साडे तीन पट एवढी प्रचंड आहे. 
उपविजेत्याला किती? 
उपविजेता संघाला $२.२४ मिलियन (सुमारे २० कोटी रुपये) मिळणे निश्चित झाले आहे. २०२२ मध्ये उपविजेत्या इंग्लंडला $६००,००० (५.२ कोटी रुपये) मिळाले होते.  
इतर संघांनाही मोठे बक्षीस...
या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला मोठी रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ: प्रत्येक संघाला $१.१२ मिलियन (१० कोटी रुपये) मिळतील. म्हणजेच ऑस्ट्रेलियाला २०२२ च्या विजेत्या रकमेपेक्षा २ कोटी रुपये कमी मिळणार आहेत. 
गट टप्प्यातील (Group Stage) प्रत्येक विजय: प्रत्येक विजयासाठी अतिरिक्त $३४,३१४ (सुमारे ३० लाख रुपये) मिळतील.
गट टप्प्यात सहभागी संघ: स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांना किमान $२५०,००० (२.२ कोटी रुपये) मिळणे निश्चित आहे.