Harmanpreet Kaur Reaction After Pakistan Spinner Nashra Sandhu Gave Death Stare : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा अपेक्षेप्रमाणे धुव्वा उडवला. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध वनडेतील हा सलग १२ वा विजय ठरला. सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचलेल्या दिमाखदार कामगिरीची चर्चा रंगत असताना आता भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात ती भर मैदानात 'पंगा' घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी स्पिनरला कडक रिप्लाय देताना दिसून येते. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरमनप्रीत कौर अन् संधू या दोघींच्यात नेमकं काय घडलं?
भारतीय संघाच्या डावातील २२ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानची स्पिनर नश्रा संधू हिने टाकलेल्या चेंडूवर हरमनप्रीत कौरनं सरळ बॉलरच्या दिशेनं फटका मारला. संधूनं हा चेंडू अडवल्यावर भारतीय कॅप्टनकडे वटारत पाहून खुन्नस दिली. यावर गप्प बसेल ती हरमनप्रीत कसली. 'पंगा' घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला तिने अगदी आपल्या स्टाइलमध्ये कडक रिप्लाय दिला. तिचे तेवर पाहून गोलंदाजी संपवल्यावर पाकिस्तानी खेळाडू फिल्डिसाठी आपल्या जागी गेली. तिने पुन्हा मान वर करून हरमनप्रीत कौरकडे पाहण्याचं धाडसही केलं नाही . सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहलीप्रमाणे हरमनप्रीत कौरही फिल्डवर आक्रमक अंदाजात वावरणाऱ्या कर्णधारांपैकी एक आहे.
'कमबॅक क्वीन'ची कमाल! पाक विरुद्ध साधला मोठा डाव; जाणून घ्या तिच्यासंदर्भातील खास गोष्ट
नो हँडशेक अन् नो टॉक शो...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील राजकीय संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. याचा क्रिकेटवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पण बहुराष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची तयारी दर्शवली आहे. पण पाकिस्तानी खेळाडू असोत किंवा ऑफिशियल्स ना संवाद ना हस्तोंदोलन अशी ठाम भूमिका टीम इंडियाने घेतली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहेत. पाक विरुद्धचा सामना झाल्यावर आता टीम इंडियाचे उर्वरित सर्व सामने भारतीय मैदानात खेळवण्यात येणार आहेत. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानचा संघ अव्वल चारमध्ये टिकेल असे वाटत नाही. जर तसे झाले तर फायनलचा सामना भारतीय मैदानात खेळवण्याचा मार्ग मोकळा होईल.