Smriti Mandhana Sets New ODI W World Record : भारतीय संघाची उप कर्णधार आणि वनडेतील क्वीन स्मृती मानधना हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्या दोन सामन्यात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या स्मृती मानधना हिने तिसऱ्या सामन्यात संयमी सुरुवात केली. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मृती मानधना हिने २० चेंडू खेळल्यावर फक्त ७ धावा केल्या होत्या. या डावातील ८ व्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारत ती दबावातून बाहेर पडली. एवढेच नाही तर या षटकारासह तिने एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियन बॅटरचा २८ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला
स्मृती मानधनासाठी हे वर्ष एकदम खास राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावे होता. १९९७ मध्ये तिने एका वर्षात ९७० धावा केल्या होत्या. २८ वर्षांचा हा विक्रम स्मृती मानधनाने मोडीत काढला आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारी पहिली महिला क्रिकेट होण्यासाठी आता तिला फक्त २८ धावांची आवश्यता आहे.
बारावीच्या परीक्षेत ९२.५ टक्के गुण; बास्केटबॉलमध्ये गोल्ड! अंपायरची लेक कशी झाली टीम इंडियाची ओपनर?
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वनडे धावा (महिला एकदिवसीय क्रिकेट)
- ९७२ – स्मृती मंधना (भारत, २०२५)*
- ९७० – बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया, १९९७)
- ८८२ – लॉरा वुल्वार्ड्ट (दक्षिण आफ्रिका, २०२२)
- ८८० – डेबी हॉ्कली (न्यूझीलंड, १९९७)
- ८५३ – एमी सॅटरथवेट (न्यूझीलंड, २०१६)
एका कॅलेंडरर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा डाव साधला, पण...
स्मृती मानधनासाठी हे वर्ष खास राहिले आहे. सातत्यपूर्ण दमदार कामगिरीसह ती ICC च्या महिला एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानावर आहे. पण 'वनडे क्वीन' महिला वर्ल्ड कप स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ करण्यात तिसऱ्या डावातही अपयशी ठरली. विश्व विक्रमाला गवसणी घातल्यावर स्मृती मानधना २३ धावांवर बाद झाली. या डावात तिने ३२ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारला. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १० चेंडूत तिने ८ धावा केल्या होत्या. पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ती ३२ चेंडूत २३ धावा करून आउट झाली होती.