Smriti Mandhana Becomes First Batter To Cross 1000 Runs : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताची सलामीची बॅटर आणि उप कर्णधार स्मृती मानधना हिने नवा इतिहास रचला आहे. महिला वनडेत एका कॅलेंडर ईयरमध्ये १००० धावा करणारी ती पहिली बॅटर ठरली आहे. स्मृती मानधनासाठी यंदाचं वर्ष एकदम खास राहिले आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यात तिला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण अल्प खेळीत तिने मोठा डाव साधल्याचे पाहायल मिळाले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत कडक अंदाजात बॅटिंग करत तिने एका वर्षात १००० धावा करण्याचा महा रेकॉर्ड सेट केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिक्सर मारत पार केला १००० धावांचा टप्पा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातच तिने बेलिंडा क्लार्क हिचा एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक ९७० धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध १८ धावा करताच स्मृतीनं कॅलेंडर ईयरमध्ये हजार धावांचा पल्ला गाठला. सोफी मोलिन्यूसच्या गोलंदाजीवर षकार खेचत तिने ही विक्रमी कामगिरी नोंदवली.
मग अर्धशतकी खेळी करत ५ हजार धावांचा पल्लाही केला सर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ५८ धावांची खेळी करताना स्मृती मानधना हिने वनडेत ५००० धावांचा पल्लाही पार केला. मिताली राजनंतर हा टप्पा पार करणारी ती दुससरी भारतीय ठरली. महिला वनडेच्या आतापर्यंतच्या इतिहासात फक्त ५ जणींनी ही कामगिरी केली आहे. त्यात स्मृती एक आहे. विशेष म्हणजे तिने सर्वात जलदगतीने हा टप्पा पार केला आहे.
महिला वनडेत ५००० धावा करणाऱ्या बॅटर
- स्मृती मानधना (भारत)
- स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज)
- सुझी बेट्स (न्यूझीलंड)
- मिताली राज (भारत)
- शार्लट एडवर्ड्स (इंग्लंड)