IND W vs AUS W 2nd Semi Final Kranti Gaud Gets Wicket Of Australian Captain Alyssa Healy : नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीली हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिंडरीच्या दुखापतीतून सावरुन मैदानात उतरलेल्या एलिसा हीलनं लिचफिल्डच्या साथीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पण बॅक टू बॅक शतक झळकवणारी हीली यावेळी स्वस्तात माघारी परतली.
हरमनप्रीत कौरची मोठी चूक, क्रांतीमुळं मिळाला मोठा दिलासा
ऑस्ट्रेलियाच्या डावातील रेणुका सिंह ठाकूर घेऊन आलेल्या तिसऱ्याच षटकात एलिसा हीली हिला एक जीवनदान मिळाले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं तिचा सोपा झेल सोडला. हरमप्रीत कौरची ही चूक टीम इंडियाला महागात पडू शकली असती. पण युवा जलदगती गोलंदाज क्रांतीनं ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीला बोल्ड करत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला.
क्रांतीनं टीम इंडियाला मिळवून दिलं पहिले यश
ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर क्रांती गौड हिने भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. क्रांती टाकेला चेंडूवर बचावात्मक फटका मारताना एलिसा फसली. चेंडू बॅटची कड घेऊन मिडल स्टंपवर आदळला अन् तिचा खेळ अवघ्या पाच धावांवर खल्लास झाला.
स्टार्कनं बायकोसह ऑस्ट्रेलियन संघाला चीअर करण्यासाठी लावली हजेरी, पण..
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघासह पत्नी एलिसा हीलीला चीअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कनंही नवी मुंबईतील स्टेडियमवर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. पण या सामन्यात त्याची बायको काही चमकली नाही. मिचेल स्टार्कची स्टँडमधील झलकही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.