Smriti Mandhana Shafali Verma Opening Pair Record : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर सातवेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्याआधी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. प्रतीका रावल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली असून तिच्या जागी आता लेडी सेहवागची अर्थात शफाली वर्माची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे.
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
लेडी सेहवाग वर्षभरानंतर मिळाली कमबॅकची संधी
शफाली वर्मानं भारताकडून अखेरचा वनडे सामना २९ ऑक्टोबर २०२४ मध्ये खेळला होता. वर्षभरानंतर तिला टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायल लढतीत ती स्मृती मानधनाच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकते. इथं एक नजर टाकुयात  स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या जोडीच्या वनडेतील रेकॉर्डवर...
हरमनप्रीत ते लॉरा! वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये फक्त एक पुरुष बॅटर
प्रतीकानं शफालीच्या जागेवर टाकला होता रुमाल
कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे शफाली वर्मावर संघाबाहेर जाण्याची वेळ आली. तिच्या जागी संधी मिळालेल्या प्रतीका रावल हिने स्मृतीच्या साथीनं जबरदस्त कामगिरी करुन दाखवली. स्मृती-प्रतीका जोडीनं भारतीय महिला संघाकडून वनडेत २३ डावात ७८.२१ च्या सरासरीसह १७९९ धावा केल्या. एवढेच नाही तर प्रतीका वर्ल्ड कप स्पर्धेतील ६ डावात ३०८ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिली. संघाबाहेर पडल्यावर शफाली वर्मानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या भात्यातील धमक दाखवली. पण प्रतीकाचा दमदार फॉर्ममुळे तिला संघाबाहेरच राहावे लागले. आता प्रतीकाच्या दुखापतीमुळे शफाली वर्माला महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाकडून धमक दाखवण्याची संधी मिळाली आहे.
स्मृती-शफाली जोडीचा रेकॉर्ड दमदार, पण....
स्मृती मानधना आणि शैफाली वर्मा या दोघींनी वनडेत २५ सामन्यात भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली आहे.  दोघींनी ३७.२० च्या सरासरीसह ८९३ धावा केल्या आहेत. स्मृती यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. तिेन ७ सामन्यातील ७ डावात ६०.८३ च्या सरासरीसह ३६५ धावा केल्या आहेत. स्मृती-शफाली जोडीही प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. पण प्रतीकाच्या तुलनेत शफाली ही अधिक आक्रमक अंदाजात फलंदाजी करण्यासाठी ओळखली जाते. तिचा हाच आक्रमक अंदाज कधी कधी संघाला अडचणीत आणणारा ठरू शकतो. जर तिने आक्रमक फलंदाजीसह स्वत:वर नियंत्रण राखत संयम दाखवला तर ती प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकते.