Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी

बेथ मूनीच्या शतकाशिवाय तळाच्या फलंदाजीत अलाना किंगची फिफ्टी अन्...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:13 IST2025-10-08T19:51:27+5:302025-10-08T20:13:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC Womens World Cup 2025 Incredible Inning Beth Mooney Registers Maiden ODI World Cup Century As Australia Script Stunning Comeback Against Pakistan | Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी

Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Womens World Cup 2025, AUS W vs PAK W Beth Mooney Great ODI World Cup Knocks With Fifth ODI Century  श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील नववा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला पाकिस्तानच्या संघाने चांगलेच अडचणीत आणल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी  

पाकिस्तानच्या संघातील बॉलर्संनी धक्क्यावर धक्के देत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ६० धावांवर पॅव्हेलियनमध्ये धाडला. गत वर्ल्ड चॅम्पियन संघ पाक विरुद्ध  शंभरीच्या आत ऑल आउट होतोय की, काय? असे चित्र निर्माण झाले असताना बेथ मूनी (Beth Mooney) ची बॅट तळपली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला ती तग धरून उभी राहिली. जिथं संघाचं शतक होईल याबाबत शंका वाटत होती त्या परिस्थितीत बेथ मूनी हिने  आपल्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तिचे हे शतक महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोत्तम शतकापैकी एक ठरते. 

बेथ मूनीच्या शतकाशिवाय तळाच्या फलंदाजीत अलाना किंगची फिफ्टी अन्...   

संघाला अडचणीतून बाहेर काढताना बेथ मूनी हिने ११४ चेंडूत १०९ धावांची खेळी साकारली. तिच्या या खेळीत  तिने आपल्या कारकिर्दीत ११ चौकार मारले. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या भात्यातून आलेली ही पहिली सेंच्युरी ठरली. तिच्याशिवाय अलाना किंग (Alana King) हिने ४९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५१ धावांची नाबाद खेळी करत निर्धारित ५० षटकात संघाच्या धावफलकावर २२१ धावा लावल्या.

रेकॉर्ड बूक पलिकडच्या प्रेरणादायी सेंच्युरी  

महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील बेथ मूनीचं शतक हे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाने ७६ धावांवर ७ विकेट्स गमावल्या असताना तिने जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाने खेळी केली. तिची ही खेळी फक्त एका मॅचच्या रुपातच नाही तर संकटात सापडल्यावर त्यातून सावरुन कसे उभे राहायचं याची प्रेरणा देणारे ठरते.त्यामुळेच तिच्या या  रेकॉर्ड बूकच्या पलिकडच्या प्रेरणादायी सेंच्यरीला नेटकऱ्यांची दाद मिळताना दिसते. 
 

Web Title : बेथ मूनी का शतक, विश्व कप में ऑस्ट्रेलिया ने पाकिस्तान को हराया

Web Summary : बेथ मूनी के शानदार शतक (109 रन) और एलाना किंग के अर्धशतक (51*) ने महिला विश्व कप में पाकिस्तान के खिलाफ ऑस्ट्रेलिया को संकट से उबारा। मूनी की पारी, जिसमें 11 चौके शामिल थे, महत्वपूर्ण साबित हुई और ऑस्ट्रेलिया ने 221 रन बनाए, जिससे पाकिस्तान हार गया।

Web Title : Beth Mooney's Century Rescues Australia, Devastates Pakistan in World Cup

Web Summary : Beth Mooney's resilient century (109 off 114) and Alana King's explosive fifty (51*) lifted Australia from a precarious position against Pakistan in the Women's World Cup. Mooney's knock, featuring 11 boundaries, proved pivotal as Australia posted a total of 221, leaving Pakistan reeling.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.