Join us

AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानच्या संघाचा स्पर्धेतील प्रवास हा साखळी सामन्यातच संपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 22:06 IST

Open in App

Australia Women Get Their 17th Win Against Pakistan Women : ऑस्ट्रेलियन महिला संघानं कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाला १०७ धावांनी पराभूत केले. बेथ मूनी अविस्मरणीय शतक आणि अलाना किंगच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने संकटातून सावर निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २२१ धावा करत पाकिस्तान संघासमोर २२२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३६. ३६.३ षटकात ११४ धावांवरच आटोपला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ऑस्ट्रेलिया टॉपला, पाकिस्तान रसातळाला

ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यातील २ विजय आणि श्रीलंकेविरुद्धच्या एका अनिर्णित सामन्यासह ५ गुण खात्यात जमा करत यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघावर पराभवाची हॅटट्रिक नोंदली आहे. ते आता गुणतालिकेत सर्वात तळाला आहेत. या स्पर्धेत त्यांचा निभाव लागणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे.

Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी

ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले, पण शेवटी संधी गमावली

पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सना हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवताना पाकिस्तानच्या संघाने कमालीची सुरुवात केली. नश्रा संधू  हिने सर्वाधिक ३ आणि रमीन शमीम आणि कर्णधार फातिमा सना  या दोघींनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले. २२ व्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या ७६ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. पाकनं मॅचवर मजबूत पकड मिळवत वर्ल्ड चॅम्पियनला नमवण्याची  संधी निर्माण केली होती. पण ते काही त्यांना जमलं नाही.   

दोघींची जोडी जमली तिथंच मॅच ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरली 

पण कमबॅक कसं करायचं हे दाखवून देत ऑस्ट्रेलियानं संघ बॅकफूटवर पुन्हा फ्रँटफूटवर आला. यासाठी बेथ मूनीनं १११ चेंडूत केेल्या १०९ धावा आणि अलाना किंगच्या नाबाद अर्धशतकी खेळीची मदत झाली. दोघींची जोडी जमली तिथंच मॅच ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरली. ७६ धावांवर ७ विकेट गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियन निर्धारित  ५० षटके खेळून काढत  २२१ धावा केल्या.  या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाकडून सिद्रा अमिन हिने केलेल्या ३५ धावा वगळता कुणालाच मैदानात तग धरता आला नाही. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थ  हिने सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय ॲनाबेल सदरलँडनं आणि मेगन शुट यांनी प्रत्येकी २-२ आणि अलाना किंग, गार्डनर आणि जॉर्जिया यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Australia Women Dominate Pakistan, Clinch Top Spot in World Cup

Web Summary : Australia defeated Pakistan by 107 runs, fueled by Mooney's century and King's fifty. Pakistan collapsed for 114. Australia tops the World Cup standings, while Pakistan faces elimination after a third consecutive loss.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५आॅस्ट्रेलियापाकिस्तान