Amol Majumdar channels his inner Rohit Sharma with the flag celebration : भारतीय महिला संघाच्या विजयानंतर संघाचे प्रमुख प्रशिक्षक अमोल मुजुमदार चर्चेत आले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा काढूनही टीम इंडियाकडून एकही संधी न मिळालेल्या या चेहऱ्यानं महिला क्रिकेटला 'अच्छे दिन' दाखवण्याचा विडा उचलला अन् 'चक दे इंडिया' चित्रपटात शाहरुखनं साकारलेल्या कबीर खानच्या भूमिकेप्रमाणे कल्पनेपलिकडची गोष्ट सत्यात उतरवली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितच्या सेलिब्रेशनची पुनरावृत्ती अमोल मुजुमदार यांनी नवी मुंबईच्या मैदानात रोवला तिरंगा
भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन केल्यावर चर्चेत आलेल्या पडद्यामागच्या हिरोचा आता आणखी एक अंदाज लक्षवेधी ठरताना दिसत आहे. भारताच्या लेकींनी नवी मुंबईचं मैदान मारल्यावर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये विजयाचं सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत फायनल जिंकल्यावर कर्णधार रोहित शर्मानं ब्रिजटाउनच्या मैदानातच तिरंगा रोवल्याचे पाहायला मिळाले. आता नवी मुंबईच्या मैदानात भारताच्या लेकी जगात भारी ठरल्यावर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी घरच्या मैदानात तिरंगा रोवत भारताचा दिमाखदार कामगिरी अधोरिखित करणारी कृती केली. ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
अभिमानास्पद क्षण अन् आजी-माजी कॅप्टनसह कोचही भावूक
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम करत नवी मुंबईच्या मैदानात २९९ धावांचा बचाव करून दाखवत वर्ल्ड चॅम्पियनचा मुकूट पटकावला. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार हमरनप्रीत कौर, उप कर्णधार स्मृती मानधनाच नव्हे तर दोन वेळा भारतीय संघाला फायनलपर्यंत नेणारी मिताली राज आणि झुलन गोस्वामी देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघाच्या विजयानंतर काय म्हणाले होते कोच?
भारताच्या लेकींना वर्ल्ड चॅम्पियन झाल्याचे पाहताना अमोल मुजुमदार देखील निशब्द झाले होते. हा अभिमानास्पद क्षण आहे. प्रत्येकीनं कठोर मेहनत घेतली आणि त्याचे चांगले फळं मिळाले. भारतीय संघाच्या कामगिरीचं शब्दांत वर्णन करु शकत नाही, अशी भावना व्यक्त केली होती. या संघासोबत काम करताना फिटनेस आणि फिल्डिंग या दोन गोष्टीवर अधिक भर दिला. ड्रेसिंग रुममध्ये यावर सातत्याने चर्चा करायचो.खेळाडूंनी दोन्ही क्षेत्रात समाधानकारक सुधारणा केली, असेही त्यांनी सांगितले होते.