Join us

सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट

यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी फायनलिस्ट मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 21:06 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025 Australia Beat Bangladesh And Enter Semis : ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीलीच्या बॅटमधून आलेले सलग दुसरे शतक आणि तिला फिबीनं दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर ऑ्ट्रेलियन संघाने बांगलादेशचा १० विकेट्स राखून धुव्वा उडवला. विशाखापट्टणमच्या मैदानातील या विजयासह ऑस्ट्रेलिया यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे बांगलादेशचा स्पर्धेतील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दोघींनी मिळून २०० धावा करत एकहाती सामना जिंकत संघाला मिळवून दिलं सेमीचं तिकीट  

विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेश महिला संघाने निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १९८ धावा करत ऑस्ट्रेलियन संघासमोर १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्यचा पाठलाग करताना कर्णधार एलिसा हीलनं सलग दुसरे शतक झळकावले. तिने ७७ चेंडूत केलेल्या नाबाद ११३ धावा आणि फीबी लिचफिल्ड हिने ७२ चेंडूत केलेल्या ८४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने २५ व्या षटकातील पाचव्या चेंडूवरच १० विकेट्स राखून विजय निश्चित केला. बांगलादेशच्या संघाला स्पर्धेतून बाद झाल्याचा टॅग लागला नसला तरी त्यांचा या स्पर्धेत निभाव लागणं मुश्किल आहे. कारण उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी ते फक्त ६ गुणांपर्यंतच पोहचू शकतील. हे गुण सेमीत एन्ट्री मारण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत. 

कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड

टीम इंडियाविरुद्ध फार्मात आली, आता बांगलादेशवरही भारी पडली

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर रुबेया हैदर हिने ५९ चेंडूत केलेल्या ४४ धावांच्या खेळीनंतर   सोभाना मोस्टरी हिने ८० चेंड़ूत केलेल्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने १९८ धावांचा आकडा गाठला. पण धावांचा बचाव करताना बांगलादेशच्या संघातील  एकाही गोलंदाजाला छाप सोडता आली नाही. भारतीय संघाविरुद्ध शतकी खेळीसह फॉर्ममध्ये परतलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार  एलिसा हीलीनं सलग दुसरे शतक झळकावत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलणारी खेळी केली. या खेळीत तिने २० खणखणीत चौकार मारल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Healy's Consecutive Century Leads Australia to World Cup Semifinals!

Web Summary : Alyssa Healy's second consecutive century, supported by Phoebe Litchfield, powered Australia to a dominant 10-wicket victory over Bangladesh. This win secured Australia's place as the first team to qualify for the Women's World Cup semifinals, while Bangladesh's journey nears its end.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५आॅस्ट्रेलियाबांगलादेश