नवी दिल्ली – क्रिकेटच्या मैदानावर नेहमी काही ना काही रेकॉर्ड बनत राहतो. खेळाडू गोलंदाजी अथवा फलंदाजीतून कमाल दाखवत राहतात. परंतु त्याचसोबत अनेकदा खेळाडू अथवा टीमच्या नावानं लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला जातो. ज्यामुळे संपूर्ण जगात त्याची चर्चा होते. अशाच काहीसा प्रकार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये घडला आहे. याठिकाणी एका संपूर्ण टीमला केवळ १६ चेंडूत सामना गमवावा लागल्याची नोंद झाली आहे.
केवळ १६ चेंडूत मॅच संपली
खरंतर हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसत नसेल ना, टी-२० क्रिकेट मॅचमध्ये एका टीमनं इतका कमी स्कोअर बनवला की दुसऱ्या टीमनं अवघ्या १६ चेंडूत मॅच संपवली. आयसीसी महिला टी-२० विश्वकप यूरोप क्वालिफायरमध्ये दोन टीममधील ही घटना आहे. फ्रान्सची महिला टीम आयरलँडच्या टीमविरोधात अवघ्या १६.१ ओव्हर खेळल्यानंतर फक्त २४ रन बनवू शकली. यात टीमने १० विकेट गमावल्या. सध्या या मॅचची क्रिकेट वर्ल्डमध्ये जोरदार चर्चा आहे.
अर्ध्याहून अधिक रन्स एक्स्ट्रा
आयरलँडविरोधात केवळ २४ रन्स बनवून ऑलआऊट होणारी फ्रान्सच्या टीमचे अर्ध्याहून अधिक रन्स एक्स्ट्रा आहेत. यात २४ मधील १३ रन्स जादा आहेत. तर या टीमच्या स्कोअरकार्डचा विचार केला तर एकाही फलंदाजाने दुहेरी आकडा पार केला नाही. त्यामुळे फ्रान्सच्या टीमची फलंदाजी किती सर्वसाधारण आहे त्याचा अंदाज लावता येऊ शकतो.
सहज आयरलँडनं मिळवला विजय
फ्रान्सकडून आयरलँड टीमला अवघ्या २५ धावांचे लक्ष्य मिळालं होतं. आयरलँडच्या टीमनं केवळ २.४ ओव्हरमध्येच विना विकेट हा सामना अलगद खिशात घातला. फ्रान्सच्या या टीमचं संपूर्ण मालिकेत खूप खराब कामगिरी राहिली आहे. आयरलँडच्या विरोधात मॅचपूर्वी नेदरलँडविरोधात फ्रान्स टीमनं ७ विकेट एकट्या गोलंदाजाला दिली होती. या मॅचपूर्वी आजतागायत कुठल्याही पुरुष अथवा महिला गोलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ७ विकेट घेतले नाहीत. त्यामुळे टी-२० च्या इतिहासात फ्रान्सच्या टीमच्या या सूमार कामगिरीची नोंद कायम राहणार असून सध्या याच मॅचची चर्चा जगभरात सुरू आहे.