ICC Women's T20 World Cup 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सराव सामन्यात भारतीय महिला संघ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध खेळताना दिसेल. यंदाच्या हंगामातील महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे पार पडणार आहे.
प्रत्येक संघाला मिळणार दोन सराव सामने
India Womenमहिला आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सहभागी असणारे १० संघ मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी प्रत्येकी २-२ सराव सामने खेळणार आहे. हे सामने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येतील. हे सराव सामने असल्यामुळे आयसीसीच्या रेकॉर्डमध्ये संघ किंवा खेळाडूच्या रेकॉर्डची नोंद होणार नाही.
सराव सामन्याचे वेळापत्रक (Warm-up fixture schedule)
२८ सप्टेंबर, शनिवार, पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड, सेव्हन्स, दुबई
२८ सप्टेंबर, शनिवार, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, सेव्हन्स, दुबई
२९ सप्टेंबर, रविवार, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेव्हन्स, दुबई
२९ सप्टेंबर, रविवार, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, आयसीसीए२, दुबई
२९ सप्टेंबर, रविवार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, आयसीसीए२, दुबई
३० सप्टेंबर, सोमवार, श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड, सेव्हन्स, दुबई
३० सप्टेंबर, सोमवार, बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, आयसीसीए२, दुबई
१ ऑक्टोबर, मंगळवार, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेव्हन्स, दुबई
१ ऑक्टोबर, मंगळवार, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, आयसीसीए२, दुबई
१ ऑक्टोबर, मंगळवार, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, आयसीसीए२, दुबई
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांचे वेळापत्रक
३ ऑक्टोबर, गुरुवार, बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड , शारजाह
३ ऑक्टोबर, गुरुवार, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजाह
४ ऑक्टोबर, शुक्रवार, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्टइंडिज, दुबई
४ ऑक्टोबर, शुक्रवार, भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
५ ऑक्टोबर, शनिवार, बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजाह
५ ऑक्टोबर, शनिवार, आस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजाह
६ ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
६ ऑक्टोबर, रविवार, वेस्टइंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
७ ऑक्टोबर, सोमवार, इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह
८ ऑक्टोबर, मंगळवार, आस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह
९ ऑक्टोबर, बुधवार, दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
९ ऑक्टोबर, बुधवार, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
१० ऑक्टोबर, गुरुवार, बांगलादेश विरुद्ध वेस्टइंडीज, शारजाह
११ ऑक्टोबर, शुक्रवार, आस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
१२ ऑक्टोबर, शनिवार, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह
१२ ऑक्टोबर, शनिवार, बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
१३ ऑक्टोबर, रविवार, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह
१३ ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध आस्ट्रेलिया, शारजाह
१४ ऑक्टोबर, सोमवार, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
१५ ऑक्टोबर, मंगळवार, इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडिज
दुबई १७ ऑक्टोबर, गुरुवार, पहिली सेमीफायनल
दुबई १८ ऑक्टोबर, शुक्रवार, दूसरी सेमीफायनल
शारजाह २० ऑक्टोबर, रविवार, फायनल, दुबई.