Join us

ICC Women's T20 World Cup LIVE : भारताचा बांगलादेशवर दमदार विजय

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशच्या आव्हानाला सामोरा जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 19:48 IST

Open in App

आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशच्या आव्हानाला सामोरा जाईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. लेग स्पिनर पूनम यादवच्या जोरावर भारताने सलामीला ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला, पण असे असले तरी भारती़य संघ बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कारण भारताला या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 2018 मध्ये ट्वेंटी-20 आशिया चषक स्पर्धेत दोनदा पराभव स्वीकारावा लागला होता. 

LIVE UPDATES...

भारताचा बांगलादेशवर दमदार विजय

बांगलादेशला सातवा धक्का

बांलगादेशला सहावा धक्का

 

बांगलादेशचा अर्धा संघ गारद

बांगलादेशला चौथा धक्का

बांगलादेशला तिसरा धक्का

बांगलादेशला मोठा धक्का, स्थिरस्थावर झालेली मुर्षिदा खातून आऊट

 

पहिल्या पॉवर प्लेमध्ये बांगलादेश १ बाद ३३

प्रथम फलंदाजी करताना भारत २० षटकांत १४२

भारताला सहावा धक्का, १७ षटकांत ६ बाद ११४

 

भारताचा अर्धा संघ गारद

- भारताला चौथा धक्का, जेमिमा आऊट

भारताला मोठा धक्का, हरमनप्रीत कौर आऊट

भारताला दुसरा धक्का

- भारताला पहिला धक्का, तानिया भाटीया आऊट

 

- टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मानधनाला ताप आल्यामुळे आजच्या सामन्यात तिला विश्रांती देण्यात आलेली आहे.

-नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या पारड्यात. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०महिला टी-२० क्रिकेटभारतबांगलादेश