Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC Women T20 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक ठरलं! 'या' तारखेला रंगणार भारत-पाक यांच्यातील सामना!

भारत-पाकिस्तान संघ एकाच गटात; कधी रंगणार हायव्होल्टेज सामना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:15 IST

Open in App

इंग्लंडच्या मैदानात रंगणाऱ्या आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या (ICC Women's T20 World Cup 2026) वेळापत्रकाची घोषणा  आली आहे. मंगळवारी, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने यंदाच्या हंगामात रंगणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.   यंदाच्या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होत असून,  प्रत्येकी ६-६ संघाच्या विभागणीसह दोन गटांत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

ICC च्या या मोठ्या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. पहिल्या गटात एकत्र असल्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना १४ जून रोजी खेळवला जाणार आहे. महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या हंगामातील स्पर्धा १२ जून ते ५ जुलैदरम्यान पार पडणार आहे. 

AUS W vs IND W : टीम इंडियाच्या 'क्वीन'ची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी डाव

पहिल्या गटातील संघ 

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स

दुसऱ्या गटातील संघ

वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड

 कोण कधी कुणाविरुद्ध कोणत्या मैदानात भिडणार?  

शुक्रवार, १२ जून

  • इंग्लंड विरुद्ध श्रीलंका – एजबेस्टन

 शनिवार, १३ जून

  • स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड – ओल्ड ट्रॅफर्ड
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ओल्ड ट्रॅफर्ड
  • वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड – हॅम्पशायर

रविवार, १४ जून

 मंगळवार, १६ जून

  • न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका – हॅम्पशायर
  • इंग्लंड विरुद्ध आयर्लंड – हॅम्पशायर

 बुधवार, १७ जून

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – हेडिंग्ले
  • भारत विरुद्ध नेदरलँड्स – हेडिंग्ले
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान – एजबेस्टन

 गुरुवार, १८ जून

  • वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड – हेडिंग्ले

 शुक्रवार, १९ जून

  • न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड – हॅम्पशायर

 शनिवार, २० जून

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स – हॅम्पशायर
  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – हॅम्पशायर
  • इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड – हेडिंग्ले

 रविवार, २१ जून

  • वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका – ब्रिस्टल
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – ओल्ड ट्रॅफर्ड

 मंगळवार, २३ जून

  • न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड – ब्रिस्टल
  • श्रीलंका विरुद्ध आयर्लंड – ब्रिस्टल
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान – हेडिंग्ले

 बुधवार, २४ जून

  • इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज – लॉर्ड्स

 गुरुवार, २५ जून

  • भारत विरुद्ध बांगलादेश – ओल्ड ट्रॅफर्ड
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स – ब्रिस्टल

 शुक्रवार, २६ जून

  • श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड – ओल्ड ट्रॅफर्ड

 शनिवार, २७ जून

  • पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स – ब्रिस्टल
  • वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड – ब्रिस्टल
  • इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – द ओव्हल

रविवार, २८ जून

  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश – लॉर्ड्स
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – लॉर्ड्स

 बाद फेरीतील लढती

 मंगळवार, ३० जून

  • सेमीफायनल १ – द ओव्हल

 गुरुवार, २ जुलै

  • सेमीफायनल २ – द ओव्हल

 रविवार, ५ जुलै

  • अंतिम सामना – लॉर्ड्स
English
हिंदी सारांश
Web Title : ICC Women's T20 World Cup Schedule Announced: India vs. Pakistan Date!

Web Summary : The ICC Women's T20 World Cup 2026 schedule is out! Twelve teams will participate, divided into two groups. India and Pakistan will clash on June 14th in a high-voltage match. The tournament will be held from June 12th to July 5th.
टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय महिला क्रिकेट संघआयसीसी