मोठी बातमी ! T20 World Cup साठी ICC ने जाहीर केला नवीन नियम 

चीफ एक्झिक्युटिव्हज कमिटेड (CEC) ने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या वन डे आणि ट्वेंटी-२०क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर हा नियम लागू करण्यास सहमती दर्शवली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:31 PM2024-03-15T12:31:07+5:302024-03-15T16:22:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC will make the Stop Clock Rule permanent during the T20 World Cup | मोठी बातमी ! T20 World Cup साठी ICC ने जाहीर केला नवीन नियम 

मोठी बातमी ! T20 World Cup साठी ICC ने जाहीर केला नवीन नियम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी नवीन नियम आणला आहे. Stop Clock नियम आता १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व वन डे सामन्यांसाठी लागू होणार आहे.  


चीफ एक्झिक्युटिव्हज कमिटेड (CEC) ने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या वन डे आणि ट्वेंटी-२०क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर Stop Clock नियम लागू करण्यास सहमती दर्शवली होती. षटकांदरम्यान लागणारा वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. जर गोलंदाजी संघ मागील षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंदात पुढील षटक टाकण्यास तयार नसेल आणि असे तीनवेळा झाल्यास त्या संघाला ५ धावांची पेनल्टी होईल.  


क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार एका षटकानंतर दुसऱ्या षटकासाठी जास्त वेळ घेतो आणि ICC च्या स्टॉप क्लॉक नियमानुसार आता असा विलंब करणाऱ्या संघाला दंड बसणार आहे. एक षटक संपल्यानंतर स्क्रीनवर ६० सेकंदांचा टायमर चालू होईल आणि त्याआधी दुसऱ्या षटकाची सुरुवात करावी लागेल. 

हे घड्याळ केव्हा बंद होईल... 

  • दोन षटकांच्यामध्ये नवीन फलंदाज फलंदाजीला येत असेल तेव्हा
  • अधिकृत ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल तेव्हा
  • फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक दुखापतग्रस्त होईल तेव्हा अम्पायरने त्याच्यावरील उपचाराला मान्यता दिली तेव्हा
  • क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची चूक नसताना वेळ वाया जाईल तेव्हा

 
६० सेकंदाचा कालावधी सुरू करण्याची जबाबदारी तिसऱ्या अम्पायरकडे असणार आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजी करण्यास तयार असेल, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाकडून वेळकाढूपणा सुरू असेल तर अम्पायर त्यांना ताकीद देतील.  

Web Title: ICC will make the Stop Clock Rule permanent during the T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.