१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या संघाने गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. बुलवायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना थॉमस रियू (Thomas Rew) च्या ११० (१०७) शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियन कॅप्टनंच शतक ठरलं व्यर्थ
इंग्लंडच्या युवा संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन U19 संघाचा कर्णधार ऑलिव्हर पीक (Oliver Peake) याने दमदार शतक झळकावले. पण त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकात उत्तम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ४७. ३ षटकात २५० धावांवर ऑल आउट केले. २७ धावांनी विजय मिळवत इंग्लंडने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
हिटमॅन रोहितनं मानले भारत सरकारचे आभार; देशासाठी आणखी ट्रॉफी जिंकण्याची व्यक्त केली इच्छा (VIDEO)
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील विजेत्यासोबत खेळणार रंगणार फायनल
पहिल्या सेमीफायनलमधील विजयानंतर इंग्लंडचा संघ आता भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यातील विजेत्यासोबत फायनल खेळताना दिसेल. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ४ फेब्रुवारीला दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्ताला भिडणार आहे. पाचवेळच्या टीम इंडियाचे पारडे जड आहे. त्यामुळे U19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत-इंग्लंड यांच्यातील थरार पाहायला मिळू शकतो. शुक्रवारी ६ फेब्रुवारीला हरारेच्या मैदानात फायनल सामना खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्याची संधी
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्या पाठोपाठ या यादीत भारतीय संघाचा नंबर लागतो. युवा टीम इंडियाने ५ वेळा U19 वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली आहे. यंदाच्या हंगामात जेतेपदाच्या षटकारासह टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्याची संधी असेल. याआधी टीम इंडियाला अफगाणिस्ताला पराभूत करावे लागेल. अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत एकदाही ही ट्रॉफी जिंकलेली नाही. इंग्लंडच्या संघाने एकमेव १९९८ मध्ये ही ट्रॉफी उंचवाली होती. हा रेकॉर्ड टीम इंडिसाठी जमेची बाजू ठरतो.
Web Summary : England defeated Australia to reach the U19 World Cup final. Thomas Rew's century propelled England to 277. Despite Oliver Peake's century, Australia fell short. England awaits the winner of India vs. Afghanistan for the final showdown.
Web Summary : इंग्लैंड ने ऑस्ट्रेलिया को हराकर U19 विश्व कप के फाइनल में प्रवेश किया। थॉमस रियू के शतक से इंग्लैंड ने 277 रन बनाए। ओलिवर पीक के शतक के बावजूद, ऑस्ट्रेलिया हार गया। अब इंग्लैंड को भारत बनाम अफगानिस्तान के विजेता का इंतजार है।