मुंबई : भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से सर्वांना माहीत आहेत. मुंबईच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या जोडीनं अनेक विक्रमी खेळी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. तेंडुलकरने स्थापन केलेल्या क्रिकेट अकादमीत कांबळी मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहेत. एरवी एकाच संघाकडून खेळणारे हे फलंदाज एकमेकांविरोधात खेळताना दिसले. नवी मुंबईतील अकादमीत तेंडुलकरच्या गोलंदाजीवर कांबळीने चांगलीच फटकेबाजी केली आणि तेंडुलकरच्या गोलंदाजीवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) त्याला ट्रोल केले.
![]()
तेंडुलकर आणि कांबळी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना नेटमध्ये कसून सराव केला. तेंडुलकरच्या गोलंदाजीवर कांबळीने फलंदाजीचा सराव केला. पण, गोलंदाजी करताना तेंडुलकरने नो बॉलची रेषा ओलांडली आणि नेमकं याचवरून आयसीसीनं त्याला ट्रोल केले. 
आयसीसीच्या या ट्विटला तेंडुलकरनेही तितक्याच चातुर्याने उत्तर दिले. आयसीसीनं तेंडुलकरला ट्रोल करताना स्टीव्ह बकनरचा फोटो वापरला. त्यावरून तर सोशल मीडियावर आणखीन हश्शा पिकल्या. तेंडुलकरनेही ते सर्व गमतीत घेतले. तो म्हणाला,''यावेळी मी फलंदाजी नाही गोलंदाजी करत आहे... पण पंचांचा निर्णय हा अंतिम.''  
![]()
तेंडुलकर आणि बकनर यांच्यातील नातं जगजाहीर आहे. बकनर यांनी अनेकदा तेंडुलकरला बाद नसतानाही तंबूत पाठवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली.  
नेटिझन्सनेही या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या