दुबई : भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये एका स्थानाने प्रगती करताना तिसरे स्थान पटकावले आहे.
पुजारा कसोटी फलंदाजांमध्ये ८७३ मानांकन गुणांसह तिसºया स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ जवळजवळ दोन वर्षांपासून अव्वल स्थानी कायम आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध पर्थमध्ये तिसºया अॅशेस कसोटीत द्विशतक झळकावले. तो सर्वाधिक मानांकन गुणांमध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमासमीप पोहोचला आहे.
तिसºया अॅशेस कसोटीत २३९ धावा फटकावणाºया स्मिथच्या खात्यावर ९४५ मानांकन गुणांची नोंद असून तो लेन हटनसह या यादीत दुसºया स्थानी आहे. ब्रॅडमन यांच्या नावावर ९६१ मानांकन गुण असून स्मिथ त्यांच्या तुलनेत १६ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. अव्वल स्थानी असताना सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत स्मिथ ब्रॅडमन यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. तो ११४ कसोटी सामन्यांत अव्वल रँकिंगवर राहिला. त्याच्यापुढे गॅरी सोबर्स (१८९), व्हिव रिचर्ड््स (१७९), ब्रायन लारा (१४०) आणि सचिन तेंडुलकर (१३९) हे फलंदाज आहेत.
गोलंदाजांच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा व आर. अश्विन अनुक्रमे तिसºया व चौथ्या स्थानावर आहेत तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन व आॅस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड यांनी एका स्थानाने प्रगती करताना अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे.
जडेजा व अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अनुक्रमे दुसºया व चौथ्या स्थानी आहेत.
पर्थ कसोटीनंतर इंग्लंडचा डेव्हिड मालानने ४७ स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम ५२ वे स्थान पटकावले आहे तर मिशेल मार्शने ४४ स्थानांची उडी घेत ६५ वे स्थान गाठले आहे. जॉन बेयरस्टोला एका स्थानाचा लाभ झाला असून तो १५ व्या तर उस्मान ख्वाजा दोन स्थानांच्या लाभासह १९ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)