Join us

Jasprit Bumrah, ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहची घरसण; पाहा विराट-रोहितचं काय झालं...

Top 10 मध्ये किती भारतीयांचा लागला नंबर.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:46 IST

Open in App

Jasprit Bumrah, ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी कसोटी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांना फायदा झाला आहे. तर जसप्रीत बुमराहला गोलंदाजी क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली असे केवळ दोनच भारतीय टॉप-१०मध्ये आहेत.

रोहित शर्मा ८व्या तर विराट कोहली १०व्या क्रमांकावर आहे. क्रमवारीत नुकताच १० हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या जो रूटला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच बाबर आझमनेही एका स्थानाने झेप घेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. विल्यमसन आता पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लाबूशेनने यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. लाबूशेनचे ८९२ गुण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रूटचे ८८२ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याला रूटने मागे टाकले आहे. याशिवाय टॉप-10 मध्ये इतर बदल नाही.

गोलंदाजांच्या टॉप १० च्या यादीत दोन भारतीय आहेत. यामध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ८५० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थिर आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. बुमराह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने यादीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. जेमिसन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचे ९०१ गुण आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही टॉप १० मध्ये आहे. त्याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो पाचव्या क्रमांकावर स्थिरावला आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहआयसीसीविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App