Join us  

आयसीसी कसोटी रँकिंग म्हणजे चक्क धूळफेक - मायकेल वॉन

भारतीय संघ सध्या आयसीसी कसोटी संघात अव्वल स्थानावर आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 3:19 AM

Open in App

मेलबोर्न : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने आंतरराष्टÑीय क्रिकेट समितीच्या रँकिंग प्रणालीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले असून, ही रँकिंग म्हणजे चक्क धूळफेक असल्याची त्याने टीका केली. सध्या आॅस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत नमविणारा एकमेव संघ आहे, तो म्हणजे भारत, असे वॉन म्हणाला.

भारतीय संघ सध्या आयसीसी कसोटी संघात अव्वल स्थानावर आहे. यानंतर न्यूझीलंड, द. आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांचा क्रम लागतो. क्रिकेटपटू ते समालोचक असा प्रवास करणारा वॉन पुढे म्हणाला, ‘माझ्या मते, न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रमश: दुसऱ्या आणि तिसºया स्थानाचे हकदार नाहीत. कारण मागच्या दोन वर्षांत हे संघ पुरेसे कसोटी सामने जिंकले नाहीत. मी आयसीसी रँकिंगबाबत पूर्णपणे प्रामाणिक आहे. माझ्या मते, रँकिंग ही धूळफेक आहे. न्यूझीलंडने मागच्या दोन वर्षांत फार सामने जिंकले नाहीत, तरीही हा संघ दुसºया स्थानी आहे. इंग्लंड मागच्या तीन-चार वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करीत आहे. परदेशी भूमीत हा संघ माघारतो, तरीही आता चौथ्या स्थानावर कसा?’इंग्लंडने केवळ मायदेशात मालिका जिंकली. केवळ आयर्लंडवर मात केली. न्यूझीलंडला मी जगातील दुसरा सर्वश्रेष्ठ संघ मानत नाही. आॅस्ट्रेलिया त्यांच्या तुलनेत कैकपटींनी उत्कृष्ट आहे. भारतीय संघ केवळ आॅस्ट्रेलियाला आॅस्ट्रेलियात लोळवू शकतो. विराट कोहलीच्या संघात उत्कृष्ट गोलंदाज, फिरकीपटू व अनुभवी फलंदाजांचा भरणा आहे.’‘आॅस्टेÑलियाला केवळ भारत नमवू शकतो’भारत आणि आॅस्ट्रेलिया हेच जगात सर्वोत्कृष्ट संघ आहेत, यात दुमत नसल्याचे सांगून वॉन म्हणाला, ‘भारतच केवळ आॅस्ट्रेलियाला मात देऊ शकतो. मागच्या १२ महिन्यात भारताने हेच केले. त्या मालिकेत स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि लाबुशेन संघात नव्हते. पुढच्या वर्षी भारत येथे येईल, त्यावेळी या तिघांचा समावेश असलेला आॅस्ट्रेलिया संघ भारताला कडवे आव्हान देईल, अशी अपेक्षा आहे. सध्या तरी आॅस्ट्रेलियावर भारताचेच पारडे जड वाटते.’

टॅग्स :आयसीसीभारतीय क्रिकेट संघइंग्लंड