Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC Test Ranking : विराट, स्मिथला थेट आव्हान; 14 कसोटी खेळलेल्या फलंदाजाची मोठी झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमावारीत बरेच धक्कादायक बदल पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 14:34 IST

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमावारीत बरेच धक्कादायक बदल पाहायला मिळाले. फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान कायम राखले आहे. पण, त्यांचे हे स्थान कधीही धोक्यात येऊ शकतं. केवळ 14 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या उदयोन्मुख फलंदाजानं थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सातत्यपूर्ण खेळीचं फळ त्याला मिळाले आहे आणि हाच फॉर्म कायम राहिल्यास तो अव्वल स्थानही पटकावू शकतो.

आयसीसीनं जाहिर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला दोन स्थानांचा फटका बसला असून तो ९व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा केन विलियम्सन, चेतेश्वर पुजारा आणि बाबर आझम यांची प्रत्येकी एक स्थानांची घसरण झाली. बेन स्टोक्सनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीच्या जोरावर पाच स्थानांची झेप घेताना टॉप टेनमध्ये एन्ट्री घेतली आहे. स्टोक्स वगळता अन्य खेळाडूंची घसरण होण्याचं कारण ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आहे. त्यानं थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यानं 14 कसोटी सामन्यांत 63.43च्या सरासरीनं 1459 धावा केल्या आहेत. त्यात चार शतकं व 8 अर्धशतकांचा समावेश आहे. 

या कामगिरीच्या जोरावर लाबुशेननं 827 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. विराट 928 गुणांसह अव्वल, तर स्मिथ 911 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ( 904) व न्यूझीलंडचा नील वॅगनर ( 852) हे पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरनं ( 830) एक स्थानांची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ( 821) चौथ्या, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ( 796) पाचव्या क्रमांकावर आहेत. भारताचा जसप्रीत बुमराह ( 794), रवीचंद्रन अश्विन ( 772) आणि मोहम्मद शमी ( 771) अनुक्रमे सहा, नऊ व दहाव्या स्थानी कायम आहेत.

टॅग्स :आयसीसीविराट कोहलीस्टीव्हन स्मिथजसप्रित बुमराहआर अश्विनमोहम्मद शामी