ICC T20 World Cup Super 8s Points Table : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ फेरीतील पहिल्या गटात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ७६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह या गटातून ते अव्वलस्थानी विराजमान झाले आहेत. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने दमदार सुरुवात करत श्रीलंकेवर ५१ धावांनी मात केली. या विजयासह २.५५० च्या नेट रन रेटसह ते आपल्या गटात अव्वलस्थानी पोहचले आहेत. संयुक्त यजमानपद भुषवणाऱ्या भारत-श्रीलंकेवर आपल्या गटात तळाला राहण्याची वेळ आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पहिल्या गटात दक्षिण आफ्रिका टॉपर; टीम इंडियासमोर तळातून 'मुंसडी' मारण्याचे चॅलेंज
भारतीय संघाला आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. पण डेविड मिलरची किलर खेळी त्याला डेवॉल्ड ब्रेविस आणि ट्रिस्टन स्टब्सनं दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुरुवातीच्या पडझडीनंतर टीम इंडियासमोर १८८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी कोलमडली. टी-२० मध्ये दबदबा असणारी टीम इंडिया १११ धावांवर ऑलआउट झाली अन् या पराभवासह -३.८०० नेट रनरेटसह भारतीय संघ गुणतालिकेत तळागाळात गेला आहे. उर्वरित सामन्यात टीम इंडियाला मोठ्या फरकाने विजय मिळवत दिमाखदार कमबॅक करण्याचे चॅलेंज आहे.
दुसऱ्या गटात न्यूझीलंड-पाकला पावसाचा फटका! पहिल्याच सामन्यात इंग्लंड फायद्यात
दुसऱ्या गटात न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील लढतीनं सुपर ८ फेरीला सुरुवात झाली. पण पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द कण्याची वेळ आली. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला. इंग्लंडच्या संघाने यजमान श्रीलंकेला पराभूत करत आपल्या गटात नंबर वनचा डाव साधला आहे.
झिम्बाब्वेसहवेस्ट इंडिजही भारतापेक्षा भारी, कारण...
सुपर ८ मधील पहिल्या गटात वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सोमवारी, २३ फेब्रुवारी, २०२६ रोजी सुपर ८ मधील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही संघ एकही सामना न खेळताही सध्या भारतीय संघाच्या पुढे आहेत. कारण भारतीय संघाचे पराभवानंतर नेट रन रेट मायनसमध्ये आहे. या दोन्ही संघातील निकालानंतर एक संघ भारताच्या आणखी पुढे जाईल.
सुपर ८ मधील पहिल्या गटातील कोणता संघ कितव्या स्थानी?
| क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | रद्द | गुण | नेट रनरेट |
|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | दक्षिण आफ्रिका | १ | १ | ० | ० | २ | +३.८०० |
| २ | वेस्ट इंडिज | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
| ३ | झिम्बाब्वे | ० | ० | ० | ० | ० | ०.००० |
| ४ | भारत | १ | ० | १ | ० | ० | -३.८०० |
सुपर ८ मधील दुसऱ्या गटातील कोणता संघ कितव्या स्थानी?
| क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | रद्द | गुण | नेट रनरेट |
|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | इंग्लंड | १ | १ | ० | ० | २ | +२.५५० |
| २ | न्यूझीलंड | १ | ० | ० | १ | १ | ०.००० |
| ३ | पाकिस्तान | १ | ० | ० | १ | १ | ०.००० |
| ४ | श्रीलंका | १ | ० | १ | ० | ० | -२.५५० |
Web Summary : South Africa and England dominate their groups in the T20 World Cup Super 8s after victories. India and Sri Lanka face challenges after suffering defeats, finding themselves at the bottom of their respective groups.
Web Summary : टी20 विश्व कप सुपर 8 में दक्षिण अफ्रीका और इंग्लैंड ने जीत के साथ अपने-अपने ग्रुप में दबदबा बनाया। भारत और श्रीलंका को हार का सामना करना पड़ा, जिससे वे अपने ग्रुप में सबसे नीचे हैं।