Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान अली आगाची कॅप्टन्सी जाणार! बाबर आझमचं करिअर संपणार; मोहसीन नक्वी असा काढणार राग

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सलमान अली आगा याची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार असल्याची बातमी समोर येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 18:47 IST

Open in App

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेवटची संधी आहे. या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळला नाहीतर ते स्पर्धेतून बाहेर पडतील. पाकिस्तान संघाला अशक्यप्राय समीकरण सोडवायला जमणार का? अशी चर्चा रंगत असताना टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सलमान अली आगा याची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार असल्याची बातमी समोर येत आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

सलमान अली आगाचे कर्णधारपद धोक्यात

पीटीआयाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील विश्वासू सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तान संघाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर असमाधानी आहेत. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात येऊ शकते. याशिवाय कोच आणि काही अनुभवी खेळाडूंसंदर्भातही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. 

कोण आहे Rehan Ahmed? इंग्लंडच्या खेळाडूचं पाकिस्तानशी खास कनेक्शन; तो भारतासाठीही ठरु शकतो डोकेदुखी

बाबर आझमसह या खेळाडूच्या टी-२० करिअर येणार संपुष्टात

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास निवडकर्ते, संघ व्यस्थापन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील काही सदस्यांनी नक्वींना दिला होता. पण संघ समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे सलमान अली आगासह अनुभवी फलंदाज बाबर आझम आणि उस्मान खान यासारख्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दच संपुष्टात येऊ शकते. पाकिस्तानी टी-२० संघाचा नवा कॅप्टन कोण? ही दोन नावे चर्चेत 

सलमान अली आगाच्या जागी शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी ही नावे कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव मोहसिन नक्वींना आशिया कप स्पर्धेनंतर आणखी एक चपराकच होती. याचाच खरा राग ते पाकिस्तान संघातील काही खेळाडूंवर काढणार का? असा प्रश्नही या बातमीनंतर निर्माण होत आहे.

भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत पाकिस्तानच्या संघाने कशी बशी सुपर ८ पर्यंत मजल मारली. पण सेमीच्या शर्यतीत टिकणं अवघड असल्याची चर्चा रंगत असताना पाकिस्तान क्रिकेटलाच संघावर आणि खेळाडूंवर भरवसा नसल्याचे दिसते. पाकिस्तानच्या संघाला सेमीच्या शर्यतीत टिकायचे असेल तर मोठ्या विजयाची गरज आहे. जर त्यांनी ६५ ते ६६ धावांनी मॅच जिंकली तर ते पात्र ठरू शकतात. जर तसे झाले तर या चर्चेला पूर्ण विराम लागणार का? ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Cricket Shake-Up: Captaincy Change and Career Endings Looming?

Web Summary : Following T20 World Cup disappointments, Pakistan's cricket board considers removing Salman Ali Agha from captaincy. Poor performance may end careers of key players like Babar Azam. Shadab Khan and Shaheen Afridi are potential captain replacements.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६पाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजम