T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा ‘जॉन्टी’! पठ्ठ्यानं हवेत झेपावत टिपला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल (VIDEO)

क्षेत्ररक्षणाचा अद्भुत अन् अविश्वसनीय नजारा, व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:21 IST2026-02-09T18:19:49+5:302026-02-09T18:21:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 Zimbabwe Won By 8 Wkts Against Oman Brian Bennett Take Stunning Catch Watch Video | T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा ‘जॉन्टी’! पठ्ठ्यानं हवेत झेपावत टिपला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल (VIDEO)

T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा ‘जॉन्टी’! पठ्ठ्यानं हवेत झेपावत टिपला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल (VIDEO)

T20 World Cup 2026, Brian Bennett Take Stunning Catch  Watch Video :  आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात  झिम्बाब्वे विरुद्ध ओमान यांच्यातील सामना सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, कोलंबो येथे खेळवण्यात आला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाने ओमानला ८ विकेट्सनी पराभूत करत विजयी सलामी दिली. या सामन्यात झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेट याने अफलातून झेल घेऊन मैफिल लुटली. त्याचा हा झेल यंदाच्या हंगामातीलच नव्हे तर क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम झेलपैकी एक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्षेत्ररक्षणाचा अद्भुत अन् अविश्वसनीय नजारा, व्हिडिओ व्हायरल 


ओमानविरुद्धच्या सामन्यात ब्रॅड इव्हान्सच्या गोलंदाजीवर नदीम खान (१८ चेंडूंमध्ये २० धावा) यांचा झेल ब्रायन बेनेटने टिपला. या झेलची खासियत म्हणजे बेनेटने लांब पल्ल्याची धाव घेत हवेत झेप घेतली आणि अविश्वसनीय झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून तंबूचा रस्ता धरण्याआधी  फलंदाजही आवाक् झाला. प्रेक्षकांसाठीही 'झिम्बाब्वेच्या ताफ्यातील जॉन्टी'ची झलक आश्चर्यचकित करून सोडणारी होती. ICC च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर स्पर्धेतील सर्वोत्तम झेल या खास कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा भेदक मारा, ओमानच्या संघानं कसा बसा पार केला शंभरीचा आकडा

 या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी घेतली होती. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. अचूक टप्प्यावर प्रभावी मारा करत झिम्बाब्वेच्या संघानं ओमानला १९.५ षटकात १०३ धावांवर आटोपले. झिम्बाब्वेकडून   ब्लेसिंग मुजरबानी याने ४ षटकात १७ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. रिचर्ड नगारावा याने ४ षटकात १६ धावा खर्च करताना ३ तर  ब्रॅड इव्हान्स याने एका षटकात ३ विकेट्सचा डाव साधला.  

क्षेत्ररक्षणात धमक दाखवल्यावर Brian Bennett फलंदाजीतही चमकला

सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केल्यावर ब्रायन बेनेट याने फलंदाजीतही धमक दाखवली. धावांचा पाठलाग करताना त्याने ३६ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्याशिवाय ब्रेंडन टेलर याने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी केली. झिम्बाब्वेनं हा सामना ८१ चेंडूत जिंकला. 

Web Title : टी20 विश्व कप: जिम्बाब्वे के बेनेट ने शानदार कैच लेकर जीत दिलाई।

Web Summary : ब्रायन बेनेट के शानदार कैच ने टी20 विश्व कप में ओमान के खिलाफ जिम्बाब्वे की जीत को उजागर किया। जिम्बाब्वे ने आठ विकेट से जीत हासिल की। बेनेट ने नाबाद 48 रन का योगदान भी दिया।

Web Title : T20 World Cup: Zimbabwe's Bennett takes stunning catch, secures victory.

Web Summary : Brian Bennett's spectacular catch highlighted Zimbabwe's win against Oman in the T20 World Cup. Zimbabwe chased down the target, securing an eight-wicket victory. Bennett also contributed with an unbeaten 48 runs.