कोण आहे Rehan Ahmed? इंग्लंडच्या खेळाडूचं पाकिस्तानशी खास कनेक्शन; तो भारतासाठीही ठरु शकतो डोकेदुखी

कोण आहे रेहान अहमद? पाकिस्तानशी त्याचे काय आहे कनेक्शन अन् तो टीम इंडियासाठी कसा ठरू शकतो धोकादायक? यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:24 IST2026-02-28T11:16:48+5:302026-02-28T11:24:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 Who Is Rehan Ahmed England All Rounder Snatched Victory From New Zealands Hands Is There Any Connection To Pakistan He Could Prove Dangerous for Team India as Well | कोण आहे Rehan Ahmed? इंग्लंडच्या खेळाडूचं पाकिस्तानशी खास कनेक्शन; तो भारतासाठीही ठरु शकतो डोकेदुखी

कोण आहे Rehan Ahmed? इंग्लंडच्या खेळाडूचं पाकिस्तानशी खास कनेक्शन; तो भारतासाठीही ठरु शकतो डोकेदुखी

ICC T20 World Cup 2026 Who Is Rehan Ahmed, Know About England All Rounder : आयसीसी पुरुष टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ फेरीतल इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने अखेरच्या षटकात विजय खेचून आणत न्यूझीलंडच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. इंग्लंडच्या या विजयासह पाकिस्तानच्या सेमीच्या आशाही पल्लवित झाल्या. यात विल जॅक्सशिवाय रेहमान अहमदची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. इथं जाणून घेऊयात कोण आहे इंग्लंडच्या ताफ्यातील २१ वर्षीय रेहान अहमद?  पाकिस्तानशी त्याचे काय आहे कनेक्शन अन् तो टीम इंडियासाठी कसा ठरू शकतो धोकादायक? यासंदर्भातील सविस्तर माहिती  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

पदार्पणातील सामन्यात प्रस्थापित केला होता विश्वविक्रम

रेहान अहमद हा एक प्रतिभावंत लेग स्पिन ऑलराउंडर आहे.  १३ ऑगस्ट २००४ मध्ये नॉटिंघम येथे जन्मलेल्या रेहान याने वयाच्या १८ व्या वर्षी पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्याने इंग्लंडकडून पदार्पण केले होते. पदार्पणातच त्याने पाच विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. कसोटीत पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधणारा तो सर्वात  युवा गोलंदाज आहे. रेहान हा इंग्लंडच्या संघाकडून तीन प्रारुपात खेळणारा सर्वात युवा खेळाडूही आहे.

NZ vs ENG : एका ओव्हरमध्ये इंग्लंडच्या बाजूनं फिरली मॅच; न्यूझीलंड 'वेटिंग'वर तर पाकिस्तान 'व्हेटिंलेटर'वर!

७ चेंडूत १९ धावा करत फिरवली मॅच

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघाने ११७ धावांवर सहावी विकेट गमावल्यावर तो मैदानात उतरला. फक्त ७ चेंडूत  १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९ धावा करत त्याने सामना इंग्लंडच्या बाजूनं फिरवला.  अनुभवी विल जॅक्स (नाबाद ३२) साथीनं त्याने १६ चेंडूत ४४ धावांची मॅच विनिंग भागीदारी रचली. त्याआधी गोलंदाजी वेळी ३ षटकात २८ धावा करत त्याने रचिन रवींद्रची महत्त्पूर्ण विकेट घेतली. 

इंग्लंडच्या ताफ्यातील या खेळाडूच पाकिस्तानशी खास कनेक्शन

रेहान अहमद याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी तो मूळचा पाकिस्तानचा आहे. त्याचे वडील नईम अहमद हे पाकिस्तानमधील  मीरपूरचे मूळ रहिवाशी आहेत. ते स्वत: एक जलदगती गोलंदाज ऑलराउंडरच्या रुपात क्लब क्रिकेट खेळायचे.  २००१ मध्ये ते इंग्लंडला आले. इथं टॅक्सी ड्रायव्हरच्या रुपात काम सुरु करून ते इंग्लंडमध्येच स्थायिक झाले. रेहान अहमद याने फार कमी वयात इंग्लंड क्रिकेटमधून आपली छाप सोडली आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने आपला मूळचा देश असलेल्या पाकिस्तानला संजीवनी देण्याच काम केलं आहे.  

इंग्लंडचा हा खेळाडू टीम इंडियासाठीही ठरू शकतो धोकादायक, ते कसं?

रेहान अहमदनं आपल्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडला विजय मिळवून दिला. सुपर ८ मधील विजयी हॅटट्रिकसह इंग्लंडचा संघ आता दुसऱ्या गटात टॉपर ठरला आहे. सेमीफायनलमध्ये ते पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाशी भिडतील. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका अव्वल क्रमांकाचा दावेदार आहे. दुसरीकडे भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत करत दुसऱ्या क्रमांकासह या गटातून सेमीसाठी शड्डू ठोकू शकतो. जर असे झाले तर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात सेमीफायनल रंगेल. या सामन्यात रेहान अहमद ऑलराउंडरच्या रुपात टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो.

Web Title : रेहान अहमद: इंग्लैंड का पाकिस्तानी कनेक्शन, भारत के लिए खतरा?

Web Summary : रेहान अहमद की महत्वपूर्ण पारी ने इंग्लैंड को टी20 विश्व कप में जीत दिलाई, जिससे पाकिस्तान की उम्मीदें बढ़ गईं। इंग्लैंड में जन्मे लेकिन पाकिस्तानी मूल के, उनकी ऑलराउंड क्षमताएं संभावित सेमीफाइनल मुकाबले में भारत के लिए खतरा बन सकती हैं। उन्होंने पदार्पण पर रिकॉर्ड तोड़ 5 विकेट लिए।

Web Title : Rehan Ahmed: England's Pakistani connection, a potential threat to India.

Web Summary : Rehan Ahmed's crucial innings aided England's T20 World Cup victory, boosting Pakistan's hopes. Born in England but of Pakistani descent, his all-round abilities could pose a threat to India in a potential semi-final clash. He took a record-breaking 5 wickets on debut.