ICC T20 World Cup 2026 WI vs ENG 15th Match : शेरफेन रुदरफोर्डच्या स्फोटक खेळीनंतर गुडाकेश मोती आणि रोस्टन चेजच्या गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तब्बल १० वर्षांनी कॅरेबियन संघाने इंग्लंडविरुद्ध आपली पॉवर दाखवली आहे. याआधी २१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत वेस्ट इंडिजनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. पण त्यानंतर आतापर्यंत एकदाही त्यांना इंग्लंडविरुद्ध विजय नोंदवता आला नव्हता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शेरफेन रुदरफोर्डची धमाकेदार खेळी, इंग्लंडकडून सॅम कुरेन एकटा पडला!
वेस्ट इंडिजच्या संघाने यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या विजयासह सुपर ८ चा आपला मार्ग सुकर केला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना आघाडीच्या फळतील फलंदाज अपयशी ठरल्यावर शेरफेन रुदरफोर्डनं ४२ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या षटकात जेसन होल्डनं १७ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १९६ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९ षटकात १६६ धावांवर आटोपला. सॅम कुरेनच्या ३० चेंडूतील नाबाद ४३ धावा वगळता अन्य कुणलााही मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती याने सर्वाधिक ३ तर रॉस्टन चेजने २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय शमार जोसेफ, रोमारियो शेफर्ड आणि अकिल होसीन यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
SA vs AFG : ट्विस्टवर ट्विस्ट! विजयी धाव घेताना फ्री हिटवर रनआउट अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला
कॅरेबियन संघ आपल्या गटात टॉपला; इंग्लंडचा संघ स्कॉटलंडच्याही पडला मागे
वेस्ट इंडिजच्या संघाने 'सी' ग्रुपमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडच्या संघाला पराभूत करत यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयासह केली होती. आता इंग्लंडला पराभूत करत त्यांनी सलग दुसऱ्या विजयासह सुपर ८ मधील आपले स्थान भक्कम केले आहे. ते सध्या आपल्या गटात अव्वलस्थानावर आहेत दुसरीकडे नेपाळच्या संघासमोर रडत खडत ४ धावांनी सामना जिंकून इंग्लंडचा संघाने एक विजय नोंदवला आहे. पण निच्चांकी धावगतीमुळे ते गुणतालिकेत स्कॉटलंडपेक्षाही मागे पडले आहेत. या गटात नेपाळही चमत्कार करण्याची धमक असणारा संघ आहे. सलामीच्या लढतीत त्यांनी ते दाखवून दिले आहे. त्यामुळे या गटात इंग्लंडला धक्का बसणार की ते सेफमध्ये सुपर ८ गाठणार? ते पाहण्याजोगे असेल.
वेस्ट इंडिज इंग्लंड यांच्यातील लढतीनंतर सी ग्रुपमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी?
| क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
|---|
| १ | वेस्ट इंडिज | २ | २ | ० | ० | ४ | +१.६२५ |
| २ | स्कॉटलंड | २ | १ | १ | ० | २ | +०.९५० |
| ३ | इंग्लंड | २ | १ | १ | ० | २ | -०.६५० |
| ४ | नेपाळ | १ | ० | १ | ० | ० | -०.२०० |
| ५ | इटली | १ | ० | १ | ० | ० | -३.६५० |