Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी; UAE विरुद्ध ९२ चेंडूत मॅच संपवत रचला इतिहास

सिक्सर मारत संपवली मॅच! टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:35 IST

Open in App

ICC T20 World Cup 2026 UAE vs NZ 11th Match Final Result :  टिम सिफर्ट आणि फिन ॲलन या सलामीवीरांच्या विश्वविक्रमी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने UAE च्या संघाला १० विकेट्स राखून दणदणीत विजय नोंदवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना युएईच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १७३ धावा करत किवी संघासमोर १७४ धावांचे टार्गेट सेट केले होते. चेपॉकच्या चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामी जोडीनं ९२ चेंडूत मॅच संपवली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सिक्सर मारत संपवली मॅच! टी-२० वर्ल्ड कपमधील विश्वविक्रमी भागीदारीचाही रेकॉर्ड

UAE च्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना टिम सिफर्टनं अवघ्या २३ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. ४२ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २११.९० च्या सरासरीनं ८९ धावांची नाबाद खेळी साकारली. २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या फिन ॲलन याने  ५० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. दोघांनी ९२ चेंडूत १७५ धावांची भागीदारी केली. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी झालेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. 

T20 World Cup 2026 स्पर्धेत यजमान संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

पुरुष टी-२० विश्वचषकातील सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड (कोणत्याही विकेटसाठी)

  • १७५* - टिम सिफर्ट आणि फिन अ‍ॅलन (न्यूझीलंड) विरुद्ध यूएई, चेन्नई, २०२६
  • १७०* - जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्स (इंग्लंड) विरुद्ध भारत,अ‍ॅडलेड, २०२२
  • १६८ - क्विंटन डी कॉक आणि रिली रूसो (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध बांगलादेश, सिडनी, २०२२
  • १६६ - महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा (श्रीलंका) विरुद्ध वेस्ट इंडिज, बार्बाडोस, २०१०
  • १५४ - इब्राहिम झदरान आणि रहमानुल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान) विरुद्ध युगांडा, प्रोव्हिडन्स, २०२४ 

न्यूझीलंडसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १५०+ धावांच्या भागीदाऱ्या (कोणत्याही विकेटसाठी)

  • १८४ – डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स विरुद्ध वेस्ट इंडिज, माउंट माऊंगानुई, २०२०
  • १७५* – टिम सिफर्ट आणि फिन अ‍ॅलन विरुद्ध यूएई, चेन्नई, २०२६
  • १७१* – मार्टिन गप्टिल आणि  केन विल्यमसन विरुद्ध पाकिस्तान, हॅमिल्टन, २०१६

टी-२० विश्वचषकातील १० विकेट्सने मिळवलेले विजय

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका,  केप टाउन, २००७
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, हंबनटोटा, २०१२
  • ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, अल अमेरात, २०२१
  • पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई, २०२१
  • इंग्लंड विरुद्ध भारत, अ‍ॅडलेड, २०२२
  • इंग्लंड विरुद्ध अमेरिका, ब्रिजटाउन, २०२४
  • न्यूझीलंड विरुद्ध यूएई. चेन्नई, २०२६
English
हिंदी सारांश
Web Title : NZ openers' record partnership seals T20 World Cup win against UAE.

Web Summary : New Zealand crushed UAE in the T20 World Cup with a stunning 10-wicket victory. Seifert and Allen's record-breaking partnership of 175 runs in 92 balls led the chase of 174, achieving the highest partnership in T20 World Cup history.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६टी-20 क्रिकेटन्यूझीलंड