ICC T20 World Cup 2026, West Indies Seal Mammoth 107-Run Win. Why It's Devastating For India : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात दोन वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजच्या संघाने फलंदाजीसह गोलंदाजीत पॉवर दाखवत झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केले. मोठ्या फरकाने मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडिजच्या संघाने टीम इंडियाचं टेन्शनही वाढवलं आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर हेटमायर आणि रॉव्हमन पॉवेलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २५४ धावांसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या संघाला पराभवाचं पाणी पाजणाऱ्या झिम्बाब्वेचा डाव १४७ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजच्या संघाने १०७ धावांनी विजय नोंदवत झिम्बाब्वेला पराभूतच केलं नाही तर टीम इंडियाचं टेन्शनही वाढवलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेट रन रेटचं गणित वेस्ट इंडिजनं केलं भक्कम, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा?
सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवत २ गुणांच्या कमाईसह ते +५.३५० नेट रनरेटसह अव्वलस्थानी विराजमान झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ + ३.८०० रन रेटसह २ गुण खात्यात जमा करून दुसऱ्या तर भारतीय संघ -३.८०० तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या सामन्यातील विजयासह मारलेली मुंसडी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण आता वेस्ट इंडिजला नेट रनरेटच्या बाबतीत मागे टाकणे भारतीय संघासाठी अशक्यप्राय असेच आहे. सध्याच्या परिस्थितीत सेमीफायनल गाठायची असेल तर सर्वात आधी टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि मग वेस्ट इंडिजला पराभूत करण्यावर फोकस करावा लागेल. पण एवढ्यावरच सेमीच समीकरण सुटणार नाही. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजला पराभूत करावे, अशी प्रार्थना देखील करावी लागेल. जर इथं वेस्ट इंडिजच्या संघानं बाजी मारली. तर दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया सेमीच्या शर्यतीत टिकणं मुश्किल होऊ शकते. कारण दुसऱ्या स्थानावर राहून रनरेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकणंही आव्हानात्मक होऊ शकते. जर दक्षिण आफ्रिकेसह भारतीय संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर मात्र टीम इंडियाचा सेमीचा मार्ग सहज सुलभ होईल.
ZIM vs WI : हेटमायरची वादळी खेळी; ख्रिस गेलचा जलद सेंच्युरीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची होती संधी, पण...
फलंदाजी वेळी हेटमायर अन् पॉवेलची पॉवर, गोलंदाजीत मोतीसह अकिल होसीन चमकला
पहिल्यांदा फलंदाजी करताना शिमरॉन हेटमायर ८५ (३४), रॉव्हमन पॉवेल ५९ (३५) यांच्यासह लो्अर मिडल ऑर्डरमधील शेरफन रुदरफोर्ड ३१ (१३), रोमिओ शेफर्ड २१ (१०) आणि जेसन होल्डर १३ (४) यांच्या धमाकेदार फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद २५४ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाकडून ब्रॅड एव्हान्स याने २१ चेंडूत केलेल्या ४३ धावा वगळता अन्य कोणत्याही बॅटरला धमक दाखवता आली नाही. गोलंदाजीत वेस्ट इंडिजच्या संघाकडून गुडाकेश मोती याने २८ धावा खर्च करून ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय अकिल होसीन याने ३, मॅथ्यू फोर्ड याने २ आणि जेसन होल्डरनं एक विकेट घेतली.