Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 WC 2026, SA vs NZ 1st Semi Final : 'काठावर पास' झालेले डाव साधणार की, अपराजित संघच फायनल खेळणार?

२००५ मध्ये पहिला सामना न्यूझीलंडच्या संघाने जिंकला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:17 IST

Open in App

ICC T20 World Cup 2026  South Africa vs New Zealand First Semi Final : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना उप विजेता दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात ४ मार्चला होणाऱ्या सामन्यात पहिला फायनलिस्ट मिळेल. यंदाच्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकही सामना न गमावता उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ काठावर पास होऊन स्पर्धेत टिकला आहे. दोन्ही संघांनी एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे पहिल्या जेतेपदासाठी कोण आगेकूच करणार ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

२००५ मध्ये पहिला सामना न्यूझीलंडच्या संघाने जिंकला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दबदबा

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात २००५ मध्ये पहिला टी-२० सामना खेळवण्यात आला होता. हा सामना न्यूझीलंडच्या संघाने जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत या दोन्ही संघात १९ सामने खेळवण्यात आले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १२ तर न्यूझीलंडच्या संघाने ५ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. एकंदरी रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं असला तरी मागच्या पाच सामन्यात न्यूझीलंडच्या संघाकडे ३-२ अशी आघाडी आहे. त्यामुळे दोन्ही संघात तगडी फाईट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

…तर भारत-इंग्लंड सामन्यातूनच मिळणार T20 World Cup 2026 चा विजेता? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं खरं कारण

टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत कोण ठरलं भारी?

टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. आतापर्यंत दोन्ही संघात रंगलेल्या पाच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघच भारी ठरला आहे.  २००७ मध्ये घरच्या मैदानात खेळताना दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडला ६ विकेट्सने मात दिली होती.  २००९ च्या हंगामात न्यूझीलंडच्या संघाने कडवी टक्कर दिली. पण अवघ्या एका धावेनं हा सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकला होता.  २०१० मध्ये  १२ धावा आणि २०१४ मध्ये २ धावांनी न्यूझीलंडच्या संघाला शह देणाऱ्या  दक्षिण आफ्रिकेनं यंदाच्या हंगामातील सुपर ८ फेरीत न्यूझीलंडला ७ विकेट्सनी मात दिली होती. 

दोन्ही संघांनी एकदा खेळली आहे फायनल, पण...

न्यूझीलंडच्या संघावर तीन वेळा सेमीफायलमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. २०२१ मध्ये ते फायलपर्यंत पोहचले. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चौथ्यांदा सेमीफायलमध्ये धडक मारली आहे. गत हंगामात ते फायनल खेळले. पण टीम इंडियाविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  

English
हिंदी सारांश
Web Title : T20 WC 2026: SA vs NZ, Final berth battle!

Web Summary : South Africa faces New Zealand in the T20 World Cup semi-final. Unbeaten South Africa clashes with the narrowly qualified New Zealand. Historically, South Africa dominates head-to-head records, but recent matches favor New Zealand, promising a thrilling contest for a spot in the final.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६द. आफ्रिकान्यूझीलंडआयसीसी