T20 World Cup 2026 : ३८ धावांत ८ विकेट्स! तीक्षणा-हसरंगाची जादू; श्रीलंकेविरुद्ध आयर्लंडनं हातातली मॅच गमावली

तीक्षणा आणि हसरंगाच्या जादू दिसली अन् श्रीलंकेच्या संघाने आयर्लंडच्या तोंडचा घास हिसकावत यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 23:53 IST2026-02-08T23:51:57+5:302026-02-08T23:53:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 SL vs IRE 6th Match Group B Sri Lanka won by 20 runs Against Ireland Wanindu Hasaranga and Maheesh Theekshana picked up three wickets each | T20 World Cup 2026 : ३८ धावांत ८ विकेट्स! तीक्षणा-हसरंगाची जादू; श्रीलंकेविरुद्ध आयर्लंडनं हातातली मॅच गमावली

T20 World Cup 2026 : ३८ धावांत ८ विकेट्स! तीक्षणा-हसरंगाची जादू; श्रीलंकेविरुद्ध आयर्लंडनं हातातली मॅच गमावली

T20 World Cup 2026, Sri Lanka vs Ireland, 6th Match : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या लढतीत 'लिंबू टिंबू' वाटणाऱ्या संघांनी तगड्या संघांना घाम फोडल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशीच्या ट्रिपल हेडर लढतीत नेपाळच्या संघाने इंग्लंडच्या संघाला अक्षरश: रडकुंडीला आणले होते. पण शेवटच्या षटकात इंग्लंडने ४ धावांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर रविवारच्या अखेरच्या सामन्यातही आयर्लंडच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा उलटफेर करण्याची संकेत दिले होते. पण तीक्षणा आणि हसरंगाच्या जादू दिसली अन् श्रीलंकेच्या संघाने आयर्लंडच्या तोंडचा घास हिसकावत यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आयर्लंड मजबूत स्थितीत होते, फिरकीपटूंची जादू दिसली अन् मॅच फिरली

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सहाव्या सामन्यात श्रीलंका संघाने आयर्लंडला २० धावांनी पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेने कामिंदू मेंडिसच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडनं २ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १०० धावा लावल्या होत्या. पण १५ व्या षटकानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी आपल्या फिरकीची जादू दाखवून देत हातून निसटणारा सामना लंकेच्या बाजूनं वळवला.

T20 World Cup 2026 : रोहितनंतर लोकेशचा जलवा! नेपाळच्या तावडीतून सॅम कुरेननं केली इंग्लंडची सुटका

सामना हातात असताना आयर्लंडचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला, याबाबतीत पाकिस्तान टॉपला

श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या १६४ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १०० पेक्षा अधिक धावा लावल्या होत्या. पण १५ षटकानंतर फलंदाजी कोलमडली. अवघ्या ३८ धावांत ऑयर्लंडनच्या संघाने ८ विकेट्स गमावल्या अन् सामना त्यांच्या हातून निसटला. वर्ल्ड कप स्पर्धेत फक्त २ विकेट्सच्या मोबदल्यात १०० पेक्षा अधिक धावा केल्यावर सर्वात कमी धावांत ८ विकेट्स गमावणाऱ्या संघांच्या यादीत आयर्लंड आता पाकिस्तानसोबत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तानच्या संघाने २०१० च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ बाद १६२ अशा मजबूत स्थितीत असताना २९ धावांत ८ विकेट्स गमावल्या होत्या. २०१४ मध्येही पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच अशी वेळ आली होती. यावेळी त्यांनी २ बाद १२६ धावा असताना ३८ धावांत ८ विकेट्स गमावल्याचा रेकॉर्ड आहे.

कामिंदू–कुसलची निर्णायक भागीदारी

पहिल्यांदा फलंदाजी करताना कामिंदू मेंडिसच्या १९ चेंडूत ४४ धावा आणि कुसल मेंडिसच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने सन्मानजनक धावसंख्या उभारली. कुसल मेंडिसने ४३ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी कुसल आणि कामिंदू यांच्यात ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. कामिंदूने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. एका टप्प्यावर श्रीलंकेची अवस्था  १४ षटकांत ४ बाद ८६ अशी होती. पण या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली.

२ बाद १०४ अशा भक्कम स्थितीत असणारा आयर्लंड संघं १४३ धावांवर ऑलआउट

श्रीलंकेनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली. कर्णधार पॉल स्टर्लिंग चौथ्या षटकात अवघ्या ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर रॉस अडैर (३४) आणि हॅरी टेक्टर (४०) यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र हसरंगाने अडैरला बोल्ड करत ही जोडी फोडली. १४ षटकानंतर आयर्लंडचा संघ  २ बाद १०४ धावा अशा भक्कम परिस्थितीत होता. अखेरच्या ६ षटकात ६० धावांची गरज होती. पण १५ व्या षटकानंतर विकेट्सचा सिलसिला सुरु झाला अन् आयर्लंडचा संघ १४३ धावांवर ऑलआउट झाला.  महिश तीक्षणा आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी ३-३ तर दुनिथ वेल्लालागे आणि दुश्मंत चमीरा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Web Title : टी20 विश्व कप: तीक्ष्णा, हसरंगा के जादू से आयरलैंड से जीती श्रीलंका।

Web Summary : श्रीलंका ने रोमांचक टी20 विश्व कप मैच में आयरलैंड को हराया। आयरलैंड ने शुरुआत में दबदबा बनाया, लेकिन तीक्ष्णा और हसरंगा की स्पिन गेंदबाजी ने खेल को पलट दिया, कामिंदू मेंडिस के अर्धशतक के बाद श्रीलंका की जीत सुनिश्चित हुई।

Web Title : T20 World Cup: Theekshana, Hasaranga's magic steals victory from Ireland.

Web Summary : Sri Lanka defeated Ireland in a thrilling T20 World Cup match. Ireland initially dominated, but Theekshana and Hasaranga's spin bowling turned the game, securing a Sri Lankan victory after Kamindu Mendis's half-century set a strong foundation.