T20 World Cup 2026, Scotland vs Italy, 7th Match : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात स्कॉटलंडच्या संघाने पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीच्या संघाला ७३ धावांनी पराभूत करत यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली. या सामन्यातील खास गोष्ट म्हणजे इटलीच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीतील स्कॉटलंडला पराभवाचा दणका देत यंदाच्या हंगामाचे तिकीट मिळवले होते. दुसरीकडे स्कॉटलंडच्या संघासाठी स्पर्धेचा दरवाजाच बंद झाला होता. पण बांगलादेशच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप सामने खेळण्यास नकार दिला अन् आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बदली संघाच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रमी कामगिरीसह अखेरच्या क्षणी मिळालेल्या संधीचं केल सोनं
या संधीच सोन करताना स्कॉटलंडच्या संघाने यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्या लढतीत निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०७ धावा करत ऐतिहासिक धावसंख्या उभारली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत असोसिएट संघाकडून पहिले द्विशतक झळकावल्यावर इटलीच्या संघाला ७३ धावांनी पराभूत करत त्यांनी असोसिएट संघाच्या रुपात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला.
Ind vs Pak सामन्यावरून तणाव वाढत असताना टीम इंडियाने अचानक घेतला मोठा निर्णय
स्कॉटलंडचा फलंदाजीत धमाका
सलामीवीर जॉर्ज मन्सीने ५४ चेंडूत ८४ धावांची दमदार खेळी करत संघाला मजबूत सुरुवात करुन दिल्यावर ब्रँडन मॅकमलनने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना अवघ्या १८ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात मायकेल लीस्कने फक्त ५ चेंडूचा सामना करताना ४०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं नाबाद २२ धावांची खेळी करत संघाच्या धावफलवाकर २०७ धावा लावल्या.
इटलीच्या संघाची खराब सुरुवात, गोलंदाजीतही लीस्कचा जलवा
विक्रमी २०७ धावांचा पाठलाग करताना जस्टिन मोस्का आणि अँथनी या बंधूंनी इटलीच्या डावाची सुरुवात केली. पण लीस्कनं पहिल्याच चेंडूवर जेस्टिनला तंबूचा रस्ता दाखवला. पुढच्याच षटकात दुसरा भाऊ अँथनीही माघारी फिरला. इटलीच्या संघाने ४० धावांवर आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. त्यानंतर बेन् आणि हॅरी मॅनेन्टी या बंधूंनी ७३ धावांची भागीदारी रचच संघाचा डाव सावरला. पण ते संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले नाहीत. अवघ्या ५ चेंडूत २२ धावा कुटणाऱ्या लीस्कने या सामन्यात ४ षटकात फक्त १७ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
टी-२० वर्ल्ड कपमध्ये असोसिएट संघांचा सर्वात मोठ्या विजयाचा रेकॉर्ड
- ८० धावा- नेपाळ विरुद्ध हाँगकाँग, चट्टोग्राम, २०१४
- ७३ धावा - स्कॉटलंड विरुद्ध इटली, कोलकाता, २०२६*
- ५९ धावा - अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, नागपूर, २०१६
- ५५ धावा- नामिबिया विरुद्ध श्रीलंका, जिओलाँग, २०२२