Pakistan vs United States of America, 12th Match : श्रीलंकेतील कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील १२ व्या सामना खेळवण्यात येत आहे. साहिबजादा फरहान याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावत टी-२० कारकिर्दीतील केलेली सर्वोच्च धावसंख्येच्या जोरावर पाकिस्तानचा संघ अमेरिकेविरुद्धची लढाई २०० पारची करेल, असे वाटत होते. पण अखेरच्या १० चेंडूत पाकिस्तानच्या संघाने १७ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन् त्यांचा डाव निर्धारित २० षटकात ९ बाद १९० धावांवरच थांबला. अमेरिकेचा संघ या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे मोठा उलटफेर करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शॅडली वॅन शॉकविक आला अन् पॉवर प्लेमध्ये पुन्हा पॉवर दाखवून गेला
अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर सैम अयुब आणि साहिबजादा फरहान याने पाकिस्तान संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्साठी पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी भागीदारी रचली. सहाव्या षटकात शॅडली वॅन शॉकविक गोलंदाजीला आला आणि त्याने सैम अयुबला तंबूचा रस्ता दाखला. याच षटकात त्याने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाला अवघ्या एका धावेवर माघारी धाडत पाकिस्तानची अवस्था ६ षटकानंतर २ बाद ५६ अशी केली. भारताविरुद्धच्या सामन्यात शॅडली वॅन शॉकविकने पॉवर प्लेमध्ये ३ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळीही त्याने आपली जादू दाखवून दिली.
T20 World Cup 2026 स्पर्धेत यजमान संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
साहिबजा फरहानचं दमदार अर्धशतक, बाबरलाही होती संधी पण....
संघ अडचणीत असताना साहिबजा फरहान याने ४१ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ७३ धावांची दमदार खेळी केली. ही त्याची टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्याही ठरली. हरमीत सिंगने त्याची विकेट घेतली. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं संयमी सुरुवात केल्यावर गियर बदलून खेळत ३२ चेंडूत ४६ धावा केल्या. पण तो पुन्हा अर्धशतकापासून वंचित राहिला. शादाब खान याने १२ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावांची उपयुक्त खेळी केली. पण त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने अखेरच्या २ षटकातील १० चेंडूत ५ विकेट्स गमावल्या. परिणामी २०० चा पल्ला गाठण्यापासून ते दूर राहिले. डेथ ओव्हर्समधील हा फ्लॉप शो पाकिस्तानला महागात पडू शकतो.