Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : क्विंटन डी कॉकनं मोडला एबी डिव्हिलियर्सचा रेकॉर्ड; पण इथं अजूनही कोहलीच 'किंग'

क्विंटन डी कॉकनं साधला मोठा डाव, एबी डिव्हिलियर्सला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:33 IST

Open in App

ICC T20 World Cup 2026 SA vs AFG, Quinton De Kock Breaks Ab De Villiers Record :  दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील १३ व्या सामन्यात कडक अर्धशतक झळकावले. या सामन्यातील ५९ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने दिग्गज क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सचा मागे टाकत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

क्विंटन डी कॉकनं साधला मोठा डाव, एबी डिव्हिलियर्सला टाकले मागे

 दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम आधी एबी डिव्हिलियर्सच्या नावे होते. एबीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २९ डावात ७१७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. १० वर्षे अबाधित असलेला हा विक्रम आता क्विंटन डी कॉकन मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विकेट किपर बॅटरनं २९ डावात ७३७ धावा आपल्या नावे केले आहे. 

Fastest To 5000 Runs In T20 Cricket : न्यूझीलंडची आस; फिन अ‍ॅलनची स्फोटक खेळी ठरली खास; अभिषेक शर्माचा वर्ल...

किंग कोहलीच्या नावे आहे सर्वाधिक धावांचा ऑलटाईम विक्रम 

टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम अजूनही किंग कोहलीच्या नावे आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत वर्ल्ड कप स्पर्धेत १२९२ धावा केल्या आहेत. 

क्विंटन डी कॉकसह रायन रिकल्टनची फिफ्टी, अन्...

डेथ ग्रुपमधील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खरा झाली. संघाच्या धावफलकावर १२ धावा असताना कर्णधार एडन मार्करम ५ धावांची भर घालून माघारी फिरला. पण त्यानंतर क्विंटन डी कॉक (५९) आणि रायन रिकेल्टन (६१) यांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला. दोघांनी केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १८७ धावा करत अफगाणिस्तानच्या संघासमोर १८८ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : De Kock surpasses De Villiers, but Kohli remains T20 'King'.

Web Summary : Quinton de Kock's fifty against Afghanistan broke AB de Villiers' T20 World Cup record for South Africa. He now has 737 runs. However, Virat Kohli still holds the all-time record with 1292 runs. De Kock and Rickelton's fifties helped South Africa set a target of 188.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६द. आफ्रिकाअफगाणिस्तानक्विन्टन डि कॉकएबी डिव्हिलियर्सविराट कोहली