SL vs AUS : निसंकाची सेंच्युरी! श्रीलंकेची सुपर ८ मध्ये एन्ट्री! ऑस्ट्रेलिया जवळपास OUT; झिम्बाब्बेचा मार्ग झाला सोपा

विक्रमी विजयासह श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला दिला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 22:30 IST2026-02-16T22:29:04+5:302026-02-16T22:30:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 Pathum Nissanka Slams Century Sri Lanka Beats Australia By 8 Wickets And Qualifies For Super Eights Now Zimbabwe Strong Contenders In Group B For Next Satge | SL vs AUS : निसंकाची सेंच्युरी! श्रीलंकेची सुपर ८ मध्ये एन्ट्री! ऑस्ट्रेलिया जवळपास OUT; झिम्बाब्बेचा मार्ग झाला सोपा

SL vs AUS : निसंकाची सेंच्युरी! श्रीलंकेची सुपर ८ मध्ये एन्ट्री! ऑस्ट्रेलिया जवळपास OUT; झिम्बाब्बेचा मार्ग झाला सोपा

ICC T20 World Cup 2026 Sri Lanka Qualifies For Super Eights After Beating Australia : पथुम निसंकाची नाबाद शतकी  खेळी आणि विकेट किपर बॅटर कुसल मेंडिसच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले आहे. या पराभवासह ऑस्ट्रेलियन संघाचा स्पर्धेतील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. दुसरीकडे झिम्बाब्वेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सलामीवीरांच्या अर्धशतकी खेळीनंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ठरली फ्लॉप अन्...

मिचेल मार्श आणि ५४ (२७) आणि ट्रॅविस हेड ५६ (२९) धावांच्या अर्धशतकी खेळीशिवाय जॉस इंग्लिस २७ (२२) आणि ग्लेन मॅक्सवेलच्या २२ (१५) उपयुक्त खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित २० षटकात १८१ धावा केल्या होत्या. सलामीवीरांच्या दमदार अर्धशतकानंतर ऑस्ट्रेलियन संघ द्विशतकी डाव साधेल, असे वाटत होते.  १८ षटकात त्यांनी ६ बाद १७५ धावांपर्यंत मजल मारली होती.  पण अखेरच्या १२ चेंडूत ऑस्ट्रेलियाने ६ धावांत  ४ विकेट्स गमावल्या.  याचा मोठा फटका संघाला बसला आहे. २००९ नंतर पहिल्यांदा ते आता टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून साखळी फेरीत बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.  

India Super 8 Schedule Announced : ठरलं! भारतीय संघ सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार पहिला सामना? ...

निसंकाचे शतकासह कुसल मेंडिसची अर्धशतकी खेळी! श्रीलंकेच्या संघाने विक्रमी विजयासह मारली बाजी

ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या ८ धावा असताना कुसल परेराच्या रुपात संघाने दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आपली पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर निसंका आणि कुसल मेंडिस जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत ९७ धावांची भागीदारी रचली. कुसल मेंडिस ३८ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५१ धावा करून माघारी फिरला. ही विकेट पडल्यावर ऑस्ट्रेलियन संघ कमबॅक करेल, असे वाटत होते. पण पवन रथनायकेनं सेट झालेल्या निसंकाला उत्तम साथ दिली अन् दोघेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटन पडले. पथुम निसंकाने ५२ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. यंदाच्या हंगामातील हे पहिले शतक ठरले.  दुसऱ्या बाजूला पवन रथनायके याने १५ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाने १८ व्या षटकात मॅच संपवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय नोंदवला. याआधी २०२२ मध्ये श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता हा रेकॉर्ड सुधारत श्रीलंकेनं नवा इतिहास रचला आहे.

झिम्बाब्वेचा पेपर झाला सोपा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह श्रीलंकेच्या संघाने स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयासह सुपर ८ मध्ये प्रवेश केला.  या निकालानंतर झिम्बाब्वेचा पुढचा पेपर सोपा झाला आहे. याउलट ऑस्ट्रेलियन संघ आता स्पर्धेत फक्त जर-तर च्या समीकरणावर टिकून आहे. 'ब' गटात श्रीलंकेशिवाय झिम्बाब्वेन सलग दोन सामने जिंकले असून गुणतालिकेत ते ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आयर्लंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यात झिम्बाब्वेला फक्त  एक सामना जिंकून सुपर ८ चं तिकीट मिळेल. याउलच ऑस्ट्रेलियाला ओमान विरुद्ध मोठ्या विजयासह झिम्बाब्वे दोन्ही सामन्यात पराभूत होवो, अशी प्रार्थना करावी लागेल.  

Web Title : निसांका का शतक, श्रीलंका सुपर 8 में, ऑस्ट्रेलिया बाहर होने के करीब

Web Summary : पथुम निसांका के शतक और कुसल मेंडिस के अर्धशतक से श्रीलंका ने ऑस्ट्रेलिया को हराकर सुपर 8 में जगह बनाई। ऑस्ट्रेलिया का सफर लगभग खत्म, जिम्बाब्वे की उम्मीदें बढ़ीं।

Web Title : Nissanka's Century, Sri Lanka Enters Super 8, Australia Nears Exit

Web Summary : Pathum Nissanka's century and Kusal Mendis's fifty powered Sri Lanka to victory over Australia, securing their Super 8 spot. Australia's journey is almost over, boosting Zimbabwe's chances.