Finn Allen Breaks Abhishek Sharma World Record Fastest To 5000 Runs In T20 Cricket : न्यूझीलंडच्या संघाची नवी आस असलेल्या धडाकेबाज सलामीवीर फिन अॅलन याने टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर यूएईविरुद्ध खेळताना त्याच्या बॅटमधून स्फोटक खेळी पाहायला मिळाली. या खेळीत अनेक विक्रमांची बरसात करताना फिन अॅलन याने भारताचा स्फोटक युवा सलामीवीर अभिषेक शर्माचा विक्रमही मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विश्वविक्रमी भागीदारीसह रचला इतिहास
UAE विरुद्धच्या सामन्यात फिन अॅलन आणि टिम सिफर्ट या जोडीनं पहिल्या विकेटसाठी १७५ धावांची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी रचली. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांच्या नावावर होता. त्यांनी २०२२ च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध १७० धावांची भागीदारी केली होती. अॅलन-सिफर्ट जोडीने हा मोठा विक्रम मागे टाकत नवा इतिहास रचला.
T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी; UAE विरुद्ध ९२ चेंडूत मॅच संपवत रचला...
अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
या ऐतिहासिक भागीदारीत फिन अॅलनने ५० चेंडूत ८४ धावांच्या नाबाद खेळीत ५ चौकार आणि ५ षटकार ठोकले. एवढेच नाही तर त्याने अभिषेक शर्मानं महिन्याभरापूर्वी सेट केलेला टी-२० क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५००० धावा करण्याचा विश्वविक्रम आता फिन अॅलनच्या नावे झाला आहे. त्याने अवघ्या २८५ चेंडूत हा पल्ला गाठला. याआधी हा विक्रम भारताच्या अभिषेक शर्माच्या नावे होता. २१ जानेवारीला नागपूरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात अभिषेक शर्मानं २८९८ चेंडूत ५००० धावा पूर्ण केल्या होत्या.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५००० धावा करणारे फलंदाज
- फिन अॅलन - २८५४
- अभिषेक शर्मा - २९९८
- आंद्रे रसेल- २९४२
- टिम डेविड- ३१२७
- विल जॅक्स - ३१९६
- ग्लेन मॅक्सवेल- ३२३९
फिन अॅलन याने षटकारांच्या खास विक्रमालाही घातली गवसणी
फिन अॅलनने षटकारांच्या बाबतीतही नवा इतिहास रचला आहे. त्याने फक्त ८७१ चेंडूत १०० षटकार पूर्ण केले आणि T20I क्रिकेटमध्ये सर्वात जलद षटकारांचे 'शतक' झळकवणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत एविन लुईस (वेस्ट इंडिज) ७८९ चेंडूत आणि करनबीर सिंग (ऑस्ट्रिया) ८१३ चेंडूत १०० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.