मुंबईतील वानखेडेच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध नेपाळ यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची वेळ आल्यावर नेपाळच्या गोलंदाजांनी फिल सॉल्ट १ (२) आणि जोस बटलर २६ (१७) या स्फोटक सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले. टॉम बॅटनही अवघ्या २ धावा करून परतल्यावर संघ अडचणीत सापडला होता. या मैदानात अमेरिकन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी फसली अगदी तसेच काहीसे चित्र नेपाळनं इंग्लंडच्या विरुद्ध खेळताना निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. सूर्याप्रमाणेच मग इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकनं संघाचा डाव साधणारे अर्धशतक झळकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन अर्धशतकवीरांनी सावरला इंग्लंडचा डाव
हॅरी ब्रुकनं ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करत संघाला मोठा दिलासा दिला. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेकॉब बेथल याने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची उपयुक्त खेळी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. या दोन अर्धशतकवीरांनी संघाचा डाव सावरल्यावर अखेरच्या षटकात विल जॅक्सची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. छोट्याखानी खेळीसह त्याने २१६.६७ च्या स्ट्राईक रेटनं अर्धशतक न करताही खास विक्रमाला गवसणी घातली.
सूर्यकुमार यादवचा वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात धमाका! मोडला किंग कोहलीचा हा 'विराट' विक्रम
अखेरच्या षटकात सूर्यादादासारखा रुबाब! तुफान फटकेबाजीसह विल जॅक्सनं सेट केला खास रेकॉर्ड
विल जॅक्सनं सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या ११ चेंडूचा सामना केल्यावर फक्त ६ धावा काढल्या होत्या. पण ७ चेंडूत त्याने षटकारांची 'बरसात' करत १८ चेंडूत ३९ धावांची नाबाद खेळी साकारली. अखेरच्या षटकात त्याने ३ षटकाराच्या मदतीने २१ धावा कुटल्या. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. वानखेडेच्या मैदानातच सूर्यकुमार यादवनं अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात २१ धावा कुटल्या होत्या. त्याच धाटणीत इंग्लंडचा डाव षटकाराने संपवत विल जॅक्सनं इंग्लंडच्या संघाच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १८४ धावा लावल्या.
Web Summary : England recovered from a shaky start against Nepal, thanks to half-centuries from Harry Brook and Jacob Bethell. Will Jacks' explosive hitting in the final over, scoring 39 off 18 balls, propelled England to a total of 184, setting a new record for a seventh-down batsman.
Web Summary : हैरी ब्रूक और जैकब बेथेल के अर्धशतकों की बदौलत इंग्लैंड ने नेपाल के खिलाफ शुरुआत में लड़खड़ाने के बाद वापसी की। अंतिम ओवर में विल जैक्स की तूफानी बल्लेबाजी से इंग्लैंड ने 184 रन बनाए, जो सातवें नंबर के बल्लेबाज द्वारा बनाया गया एक नया रिकॉर्ड है।