Jason Holder And Romario Shepherd World Record 89 Run Partnership : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सुपर ८ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) आणि जेसन होल्डर यांनी विश्वविक्रमी भागीदारी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील रबाडा, लुंगी एनिग्डी आणि कॉर्बिन बॉशच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या संघाने अवघ्या ८३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत सापडला असताना जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड जोडी जमली. दोघांनी दमदार खेळीसह संघाच्या धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या लावली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एकापोठोपाठ एक विकेट गमावल्यावरही कोणत्याही दबावात न खेळता दोघांनीही आपल्या अंदाजात फटकेबाजी करत बॅटिंगचा खास नजराणा पेश केला. आठव्या विकेटसाठी ५७ चेंडूत ८९ धावांची भागीदारी रचत त्यांनी खास विक्रमाला गवसणी घातली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतच नव्हे तर आंतरारष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आठव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील विकेटसाठी झालेली ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १७६ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे टार्गेट सेट केले. जेसन होल्डरनं ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला शेफर्ड याने ३७ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले.
आंतरारष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ८ व्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा रेकॉर्ड
- जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड (वेस्ट इंडीज) ८९ दक्षिण आफ्रिका २०२६
- रुबेन ट्रम्पेलमन, डेव्हिड विसे (नामिबिया) ७० युएई २०२२
- मोईन अली, डेव्हिड विली (इंग्लंड) ५७* अफगाणिस्तान २०१६
टी२० मध्ये ८ व्या विकेटसाठी किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८९ धावा जोडल्यानंतर होल्डर आणि शेफर्डच्या जोडीने टी२० मध्ये ८ व्या विकेटसाठी किंवा त्यापेक्षा कमी धावांसाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी देखील नोंदवली. बेल्जियमच्या साबर जाखिल आणि सकलेन अली यांच्या नावावर हा विक्रम आहे, त्यांनी २०२१ मध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध नवव्या विकेटसाठी १३२ धावा जोडल्या होत्या.
- १३२* - साबर जाखिल, सकलेन अली (बेल्जियम) विरुद्ध ऑस्ट्रिया, वॉटरलू, २०२१
- ८९ - रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, २०२६
- ८८* - चेरनोह बाह, लान्साना लामिन (एसएलई) विरुद्ध एस्वाटिनी, अबुजा, २०२४
- ८० - प्रेस्टन मोमसेन, सफयान शरीफ (एससीओटी) विरुद्ध एनईडी, एडिनबर्ग, २०१५
- ७८ - रोमारियो शेफर्ड, शमार स्प्रिंगर (वेस्ट इंडीज) विरुद्ध न्यूझीलंड, नेल्सन, २०२५