Join us
Daily Top 2Weekly Top 5

IRE vs Oman : पार्ट टाईम कॅप्टनची कमाल! रोहित-सूर्याला टाकले मागे; आयर्लंडनं ओमानविरुद्ध उभारली विक्रमी धावंसख्या

आयर्लंच्या कॅप्टनने एका डावात अनेक दिग्गजांना टाकले मागे, पण शतक थोडक्यात हुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:01 IST

Open in App

Ireland vs Oman, 22nd Match : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आयर्लंड विरुद्ध ओमान यांच्यातील सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब स्पर्धेतील खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कार्यवाहू आयरिश कर्णधार लॉर्कन टकर याच्या नाबाद  ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर आयर्लंडच्या संघाने ओमानविरुद्ध ५ बाद २३५ धावा ठोकल्या आहेत. यंदाच्या हंगामातील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. एवढेच नाही तर टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या ठरली. या सामन्यात लॉर्करनंच शतक अवघ्या ६ धावांनी हुकलं. पण या दमदार खेळीत त्याने हिटमॅन रोहित शर्मासह सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शतक हुकलं, पण आयर्लंच्या कॅप्टनने एका डावात रोहित - सू्र्यासह अनेक दिग्गजांना टाकले मागे

आयर्लंडचा नियमित कर्णधार पॉल स्टर्लिंगच्या जागी कार्यवाहू कर्णधाराच्या रुपात मैदानात उतरलेल्या  लॉर्कन टकर याच्याकडे यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळाकवण्याची संधी होती. पण अखेरच्या षटकातील तीन चेंडूवर तो नॉन स्ट्राईकलाच राहिला.  स्ट्राईकवर असलेल्या जॉर्ज डॉकरेलनं शतकी डाव साधण्यासाठी कॅप्टनला स्ट्राईक देण्याऐवजी तुफान फटकेबाजीला करत संघाच्या धावफलकावर मोठी धावसंख्या लावण्याला भर दिली. त्याने ९ चेंडूत ३८८ च्या स्ट्राईक रेटनं ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा केल्या. टकरचे शतक हुकले असले तरी त्याने ५१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कॅप्टनच्या रुपात सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्मासह सूर्युकमार यादवलाही मागे टाकले आहे.

Ind vs Pak: पाकिस्तानचा 'फेकी बॉलर' Usman Tariq बाबत सुनील गावसकर म्हणाले- "ही अ‍ॅक्शन..."

T20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधारांनी केलेले सर्वोच्च वैयक्तिक धावा  

  • ९८ – क्रिस गेल (Chris Gayle) vs भारत, ब्रिजटाउन, २०१०
  • ९४* – लोरकन टकर (Lorcan Tucker) vs ओमान, कोलंबो SSC, २०२६
  • ९२ – रोहित शर्मा (Rohit Sharma) vs ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाउन, २०२४
  • ८८ – क्रिस गेल (Chris Gayle) vs ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, २००९
  • ८५ – केन विल्यमसन (Kane Williamson) vs ऑस्ट्रेलिया, दुबई, २०२१ 
  • T20 वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
  • २६०/६ – श्रीलंका vs केन्या, जोहान्सबर्ग, २००७
  • २३५/५ – आयर्लंड vs ओमान, कोलंबो SSC, २०२६*
  • २३०/८ – इंग्लंड vs साऊथ आफ्रिका, वानखेडे, २०१६
  • २२९/४ – साऊथ आफ्रिका vs इंग्लंड, वानखेडे, २०१६
  • २२५/५ – श्रीलंका vs ओमान, पल्लेकले, २०२६ 

आयर्लंडची T20I मधील सर्वोच्च धावसंख्या

  • २३५/५ – vs ओमान, कोलंबो SSC, २०२६*
  • २२६/४ – vs ऑस्ट्रिया, एडिनबर्ग, २०२३
  • २२५/७ – vs अफगाणिस्तान, अबू धाबी, २०२३
  • २२१/५ – vs भारत, मॅलाहाइड, २०२२
English
हिंदी सारांश
Web Title : Ireland's Record Score Against Oman; Captain Misses Century Narrowly

Web Summary : Ireland amassed a record 235/5 against Oman in the T20 World Cup, thanks to captain Lorcan Tucker's unbeaten 94. The score is the second-highest in T20 World Cup history. George Dockrell's quickfire 35 also boosted the total, overshadowing Tucker's century bid.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६आयसीसीआयर्लंड