IND vs USA, ICC T20 World Cup 2026 India’s Third Lowest Powerplay Total In Home T20Is मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील USA विरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघ धावांची 'बरसात' करेल, अशी अपेक्षा होती. पण पहिल्यांदा फलंदाजी करताना अमेरिकन गोलंदाजांसमोर भारतीय संघातील हिरो अक्षरश: झिरो ठरले. ईशान किशन आणि अभिषेक शर्मानं भारताच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात ईशान किशनचा एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. पण हा शानदार शो कायम राहिला नाही. दुसऱ्या षटकात अभिषेक शर्माच्या रुपात टीम इंडियाने आपली पहिली विकेट गमावली. अभिषेक शर्माला खातेही उघडता आले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पॉवर प्लेमध्ये फ्लॉप शो! टीम इंडियाने एका षटकात गमावल्या तीन विकेट्स अन्...
अभिषेक शर्मा खातेही न उघडता पहिल्याच चेंडूवर माघारी फिरल्यावर ईशान किशन आणि तिलक वर्मारडून आस होती. पण ३७ धावांच्या भागीदारीनंतर ही जोडीही फुटली. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात ईशान किशनसह २० (१६) तिलक वर्माने २५ (१६) आपली विकेट गमावली. याच षटकात शॅडली वॅन शॉकविक याने शिवम दुबेला आल्यापावली माघारी धाडले. अन् भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये अवघ्या ४६ धावांत आघाडीच्या चार विकेट्स गमावल्या. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तिसऱ्यांदा घरच्या मैदानात टीम इंडियाची पॉवर प्लेमधील ही तिसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. याआधी २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नागपूरच्या मैदानात भारतीय संघाने अवघ्या २९ धावांवर ४ विकेट्स गमावल्याचा रेकॉर्ड आहे. अमेरिकेविरुद्ध ही कामगिरीही निराशजनकच आहे.
T20 World Cup 2026 : अली खानसमोर अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'सह आली 'गंभीर' वेळ
विकेट्सचा हा सिलसिला कायम राहिला, फक्त सूर्या थांबला नाहीतर...
पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यावर मिडल लोअर ऑर्डरमधील फलंदाजांकडून डाव सावरण्याची आस होती. पण ना हार्दिक पांड्याला धमक दाखवता आली ना रिंकू सिंहची बॅट तळपली. सूर्यकुमारच्या अर्धशतकाशिवाय अन्य कुणाचाही निभाव लागला नाही. त्यामुले भारतीय संघ अमेरिकेविरुद्ध फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारण्याचा डावा साधता आला नाही.