India vs West Indies, 52nd Match, Super 8 Group 1 : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजच्या सामन्यासाठी कोणताही बदल न करता मागच्या सामन्यात जो संघ निवडला त्याच्यावर भरवसा दाखवत टीम इंडियानं सेमीच तिकीट मिळवण्यासाठी शड्डू ठोकला आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. भारत प्लेइंग इलेव्हन :
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन :शई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, शामर जोसेफ.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेती वेस्ट इंडिचा रेकॉर्ड भारी, पण ही आकडेवारी देते सेमीची हमी
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ४ सामने खेळवण्यात आले आहेत. यात ३ वेळा वेस्ट इंडिजच्या संघाने बाजी मारली आहे. दुसरीकडे टीम इंडियाने फक्त एकच सामना जिंकला आहे. पण टॉस जिंकून टीम इंडियाने ही आकडेवारी बाजूला ठेवून सेमीचं दावेदारी भक्कम असल्याचे संकेत दिले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना कॅरेबियन संघाचा रेकॉर्ड भार चांगला नाही. त्यामुळे सूर्यानं नाणेफेक जिंकून जो डाव खेळला आहे तो भारतीय संघाला सेमीची हमी देणारा ठरेल, असे वाटते.
भारतामध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केल्यावरचा निकाल
- पाच विकेट्सनी पराभव, कोलकाता, २०१८
- सहा विकेट्सनी पराभव, चेन्नई, २०१८
- सहा विकेट्सनी पराभव, हैदराबाद, २०१९
- सहा विकेट्सनी पराभव, कोलकाता, २०२२
Web Summary : India won the toss and chose to bowl against West Indies at Eden Gardens. The team remains unchanged, showing confidence in securing a semi-final berth. West Indies made one change to their playing eleven. India's playing eleven is listed.
Web Summary : भारत ने टॉस जीतकर वेस्ट इंडीज के खिलाफ ईडन गार्डन्स में पहले गेंदबाजी करने का फैसला किया। टीम में कोई बदलाव नहीं, सेमीफाइनल में जगह पक्की करने का भरोसा। वेस्ट इंडीज ने एक बदलाव किया। भारत की प्लेइंग इलेवन सूचीबद्ध है।