भारत आणि वेस्ट इंडिज संघ सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिमवर उतरले आहेत. सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर कॅरेबियन संघाकडून शई होप आणि रोस्टन चेज जोडीनं वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. गोलंदाज जीव तोडून गोलंदाजी करत असताना भारतीय फलंदाजी गडबडल्याचे चित्र पाहायला मिळाले. वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी मोठी चूक केली अन् वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी त्याचा फायदाही उठवला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
वरुण चक्रवर्तीची मोठी चूक
पॉवर हिटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या दोन षटकात सावध पवित्रा घेत संयम दाखवला. दोन षटकानंतर त्यांनी धावफलकावर फक्त १३ धावा लावल्या होत्या. याचा दबाव बॅटरवर आला अन् रोस्टन चेज आणि शई होप यांच्यातील ताळमेळ ढासळला. डावातील तिसऱ्या ,टकातील अर्शदीपच्या षटकात दोघेही एकाच क्रिजमध्ये आले. पण वरुण चक्रवर्तीनं रनआउटची संधी गमावली. त्यानेच शई होपच्या रुपात पहिली विकेट मिळवून दिली. पण तोपर्यंत वेस्ट इंडिजला एक चागंली सुरुवात मिळाली होती.
अभिषेक शर्मानं तर सोपा झेल सोडला, सूर्य फक्त बघतच राहिला
पॉवर प्लेमधील पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं रोस्टन चेजला आपल्या जाळ्यात अडकवले. तो मोठा फटका मारायला गेला ण चेंडूत हवेत उडाला. पण अभिषेक शर्मानं साधा सोपा झेल सोडला. जसप्रीत बुमराहनं १२ व्या षटकात त्याला माघारी धाडेपर्यंत त्याने २५ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे ही चूक टीम इंडियाला किती महागात पडणार ते निकाल लागल्यावरच समजेल.