ICC T20 World Cup 2026 IND vs PAK : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे. दुसरीकडे भारतीय संघ दोन बदलासह मैदानात उतरणार असल्याचे सूर्यकुमार यादवनं नाणेफेकीनंतर स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टॉस गमावला, पण सूर्यासह टीम इंडियाच्या मनासारख घडलं
सूर्यकुमार यादव याने नाणेफेक गमावली असली तरी टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणार होतो, असे म्हटले. त्यामुळे पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असली तरी सूर्याच्या मनासारख झालं अन् टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. अभिषेक शर्मा या सामन्यासाठी फिट असून तोच भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल. याशिवाय चायनामन कुलदीप यादवलाही भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. अर्शदीपच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार असून हा निर्णय टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
IND vs PAK : पाक खेळाडूंची बसमधील झलक दिसली, पण टीम इंडियाच्या खेळाडूंचे दर्शनच नाही झालं, कारण...(VIDEO)
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, इशान किशन (डब्ल्यू), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आघा (क), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (डब्ल्यू), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक