ICC T20 World Cup 2026 England Win By 24 Runs Against Italy : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'क' गटात इटलीसमोर २०० पार धावसंख्या उभारुनही इंग्लंडच्या संघाचे धाबे दणाणले होते. विल जॅक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद २०२ धावा करत इटलीसमोर तगडेआव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना इटलीने तगडी फाईट दिली. अखेरच्या षटकात ग्रँट स्ट्युअर्टच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर इटलीनं या गटात मोठा उलटफेर करण्याचे संकेत दिले होते. पण सॅम कुरेन याने १९ व्या षटकात त्याची विकेट घेतली अन् शेवटी इंग्लंडच्या संघाने इटलीच्या संघाला १७८ धावांवर आटोपत सुपर ८ मधील प्रवेश निश्चित केला. याआधी नेपाळ विरुद्धही इंग्लंडच्या संघाने निसटता विजय मिळवला होता. यावेळीही शेवटच्या षटकात सॅम कुरेन याने मॅच विनिंग षटक टाकले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०० पारच्या लढाईत जस्टीन मोस्कासह बेन मेंतोनीची बॅट तळपली
इंग्लंडच्या संघाने ठेवलेल्या २०३ धावांचा पाठलाग करताना इटलीची सुरुवात खराब झाली. अँथॉनी मोस्का आणि जेजे स्मूट्स खातेही न उघडता माघारी फिरले. या दोघांनी जोरफ्रानं तंबूचा रस्ता दाखवला. संघ अडचणीत असताना सलामीवीर जस्टीन मोस्का याने ३४ चेंडूत ४३ धावांची दमदार खेळी केली. मध्य फळतील बेन मेंतोनी याची बॅट तळपली. त्याने २४० च्या स्ट्राईक रेटनं २५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकार खेचत संघाला मॅचमध्ये आणले.
India Super 8 Schedule Announced : ठरलं! भारतीय संघ सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार पहिला सामना? ...
सॅम कुरेन याने ग्रँट स्ट्युअर्टची विकेट घेतली अन् इंग्लंडने टाकला सुटकेचा निश्वास
अखेरच्या षटकात ग्रँट स्ट्युअर्ट याने उत्तुंग फटकेबाजी करत आपल्या बॅटिंमधील धमक दाखवत इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. त्याने २३ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली. अखेरच्या१२ चेंडूत ३० धावांची गरज असताना १९ व्या षटकात तो बाद झाला. सॅम कुरेन याने त्याची विकेट घेत पुन्हा एकदा डेथ ओव्हमध्ये आपली जादू दाखवली आणि इंग्लंडचा पराभवाचे संकट टाळत संघाला सुपर ८ चं तिकीट मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात सॅम करेन याने ३ षटकात २२ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. याशिवय जोफ्रा आर्चरने २ तर जेमी ओव्हरटन, विल जॅक्स आदिल रशीद याने प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
विल जॅक्सची नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने गाठला २०० धावांचा पल्ला
इंग्लंडच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फिल सॉल्ट याने १५ चेंडूत २८ धावांची खेळी करत संघाला आक्रमक अंदाजात सुरुवात करून दिली. बटलर पुन्हा एकदा स्वस्तात माघारी फिरला. त्याने ४ चेंडूत फक्त ३ धावा काढल्या. जेकब बेथल २३ (२०), टॉम बँटन ३० (२१) आणि सॅम कुरेन २५ (१०) यांच्या उपयुक्त खेळीनंतर विल जॅक्सनं २२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर ७ बाद २०२ धावा लावल्याचे पाहायला मिळाले.